esakal | Police Recruitment : सोलापुरात चौदा केंद्रांवर होणार गुरुवारी पोलिस भरती!
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरती

सोलापूर शहर पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्‍त असलेल्या 67 पोलिस शिपाई पदांसाठी भरती होणार आहे.

सोलापुरात चौदा केंद्रांवर होणार गुरुवारी पोलिस भरती!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलाच्या (Solapur City Police Force) आस्थापनेवरील रिक्‍त असलेल्या 67 पोलिस शिपाई पदांसाठी भरती (Recruitment) होणार आहे. त्यासाठी गुरुवारी (ता. 7) दुपारी 12 वाजता शहरातील 14 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या पोलिस अंमलदारांचे नातेवाईक या भरतीसाठी बसले आहेत, त्यांना बंदोबस्ताची ड्यूटी दिली जाणार नसल्याचे आयुक्‍तालयाने स्पष्ट केले आहे. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अंमलदारांनी त्यासंदर्भातील प्रमाणपत्र द्यावे, अशी अटदेखील घालण्यात आली आहे.

हेही वाचा: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती!

शहरातील वालचंद कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड सायन्स कॉलेज, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, कस्तुराबाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, दयानंद काशिनाथ आसावा हायस्कूल, सोलापूर सोशल असोसिएशन आर्टस्‌ ऍण्ड कॉमर्स कॉलेज, संगमेश्‍वर कॉलेज, अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड सोशल सायन्स, मातोश्री गिरीजाबाई ढोबळे वूमन्स कॉलेज, हिंदुस्थानी कॉन्वेंट चर्च इंग्लिश मीडियम स्कूल आणि भू. म. पुल्ली कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

हेही वाचा: Jobs : FSSAI मध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती!

पोलिस शिपायाच्या 67 जागांसाठी सुमारे आठ हजार 800 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रांबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यासाठी शहरातील सात पोलिस ठाण्यांकडील 162 तर पोलिस मुख्यालय, सायबर, स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर, शहर वाहतूक, विशेष शाखा यासह अन्य शाखांकडील 264 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.

loading image
go to top