esakal | Jobs : विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती! बीई, बीटेक उमेदवारांना संधी
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती! बीई, बीटेक उमेदवारांना संधी

बीई / बीटेक / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : बीई (B. E.) / बीटेक (B. Tech.) / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये (Hotel Management) पदवी घेतलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची (Government Job) उत्तम संधी चालून आली आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Center - VSSC) ने बीई / बीटेक / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलेल्या तरुणांसाठी पदवीधर प्रशिक्षणार्थी भरतीची घोषणा केली आहे.

या अंतर्गत विविध ट्रेड्‌समध्ये एकूण 167 जागा रिक्त आहेत. यासाठी इच्छुक पात्र उमेदवार 8 ऑक्‍टोबरपर्यंत विक्रम साराभाई स्पेस सेंटर https://www.vssc.gov.in च्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, यासाठी बीई / बीटेक किंवा हॉटेल मॅनेजमेंटमधील प्रथम श्रेणी पदवीधर असणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: MPSC ची ना वाढली वयोमर्यादा ना निघाली 15 हजारांची भरती !

पदांची संख्या

 • एअरोनॉटिकल / एअरोस्पेस : 15 पदे

 • केमिकल इंजिनिअरिंग : 10 पदे

 • सिव्हिल इंजिनिअरिंग - 12 पदे

 • कॉम्प्युटर सायन्स : 20 पदे

 • इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग : 12 पदे

 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग : 40 पदे

 • मेकॅनिकल इंजिनिअरिंग : 40 पदे

 • मेटलर्जी : 06 पदे

 • प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंग : 06 पदे

 • फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग : 02 पदे

 • मॅनेजमेंट / केटरिंग टेक्‍नॉलॉजी : 04 पदे

जाणून घ्या पात्रता

 • पदवीधर प्रशिक्षणार्थी : संबंधित क्षेत्रात किमान 65 टक्के गुणांसह तीन - चार वर्षांच्या कालावधीचा (लेटरल एंट्रीसाठी) प्रथम श्रेणी BE / B.Tech

 • व्यवस्थापन / केटरिंग टेक्‍नॉलॉजी : 60 टक्के गुणांसह हॉटेल व्यवस्थापनात प्रथम श्रेणी पदवी.

हेही वाचा: Jobs : FSSAI मध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती!

ही आहे वयोमर्यादा

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांचे वय 30 वर्षे असावे. वयोमर्यादा OBC साठी 33 वर्षे, SC / ST साठी 35 वर्षे आणि PWD उमेदवारांसाठी 40 वर्षे आहे.

loading image
go to top