अती गंभीर कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी पस्तीस हजार रुपयाचे इंजेक्‍शन 

corona.gif
corona.gif

सोलापूरः शहरातील रुग्णालयात कोरोनाच्या उपचारामध्ये एक सर्वाधिक महागडे इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. टसले झुम्यांब नावाचे हे इंजेक्‍शन आहे. कोरोनापासून बचावासाठी शरीराची प्रतिकारक्षमता अचानक कैकपटीने वाढून शरीरात एक प्रकारच्या वादळाची स्थिती निर्माण होते. अती गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाच्या शरीरातील वादळी स्थिती सौम्य करण्यासाठी हे इंजेक्‍शन वापरले जाते. सोलापूरमध्ये अशा प्रकारची औषधे उपलब्ध होऊ लागली आहेत. हे ईंजेक्‍शन 35 हजार रुपये किमतीचे आहे. 

शहरातील शासकीय हॉस्पिटल वगळता इतर खासगी रुग्णालयांत इतर आजारांची गुंतागुंत असलेल्या गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबत अत्याधुनिक यंत्रणा व मोठ्या शहरातून मागविलेल्या औषधांमुळे उपचाराची गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुणे व मुंबईत मिळणारी औषधे व इंजेक्‍शन आता सोलापुरात उपलब्ध करण्यात आली आहेत. 

शहरात अनेक खासगी व सहकारी रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयानंतर इतर रुग्णालयांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या उपचारात आर्थिक सक्षम असलेल्या गटासोबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेणारे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना सेवा दिली जात आहे. योजनेच्या अंतर्गत रुग्णांसाठी बेड ही आरक्षित केले आहेत. 
गंभीर स्थितीतील रुग्णांना आयसीयूची सेवा देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुणे व इतर शहरांत उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना आता सोलापुरातच उपचार मिळत आहेत. या रुग्णालयांनी उपचारासाठी लागणारी एचएफओ, व्हेंटिलेटर आदी यंत्रसामग्री वाढवली आहे. आता महापालिकेने खासगी रुग्णालयांना कोरोना टेस्ट करण्यासाठी मजरेवाडी, दाराशा हॉस्पिटल आदी चार केंद्रे उपलब्ध केली आहेत. त्यामुळे टेस्ट वाढवल्या जात आहेत. जेवढे टेस्ट डिटेक्‍शन जास्त होईल, तेवढे मृत्युदरावर नियंत्रण वाढू शकते. सध्या टेस्ट करण्याचे प्रमाण एकूण क्षमतेच्या तुलनेत कमी आहे, हे वास्तव दिसू लागले आहे. टेस्ट कमी केल्या तर पॉझिटिव्हचा आकडा कमी राहील, असे धोरण राबविल्याने मृत्युदर वाढत आहे. या द्विधा स्थितीतून यंत्रणा बाहेर येणे गरजेचे आहे. अँटीजन टेस्टमुळे हे चित्र बदलेल, असे मानले जाते. या रुग्णालयांमुळे आता गंभीर रुग्णांना उपचार मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

अत्याधूनीक यंत्रणा व औषधांचा उपचारात उपयोग 
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता गंभीर व गुंतागुंतीच्या आजाराच्या रुग्णांना तातडीचे उपचार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचे परिणाम चांगले मिळू लागले आहेत. मात्र, कोरोना टेस्टचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहेत. 
- डॉ. सुदीप सारडा, अध्यक्ष, हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com