

Mystery Deepens as Tiger Remains Unseen in Yedshi Wildlife Sanctuary
sakal
सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी परिसरात आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात खळबळ माजवणारा आणि वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेला वाघ गेल्या चार महिन्यांपासून ‘बेपत्ता’ असल्याने वनविभागासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. १९ डिसेंबर २०२४ पासून बार्शी परिसर आणि धाराशिवच्या येडशी (रामलिंग) अभयारण्यात वास्तव्य करणाऱ्या या वाघाचा अलीकडच्या काही महिन्यांमध्ये कोणताही मागमूस लागलेला नाही.