
सोलापूर : आदिवासी, पारधी समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या विविध ५६ लोकांना राष्ट्रपती कार्यालयाकडून भेटीचे आमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये सोलापूरच्या शिष्टमंडळाचाही समावेश होता. माजी नगरसेविका तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्या राजश्री चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष कोमल चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पारधी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा केली. राष्ट्रपतींनी लवकरच पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे, त्यावेळी देखील आपणास आमंत्रित करू असे आश्वासन देतानाच पारधी समाजाच्या उन्नतीसाठी योग्य ते सर्व आदेश संबंधितांना देण्याचे आश्वासन दिले.