Accident
Accident esakal

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! 5 ठार तर 6 जखमी

महामार्गावर ट्रक आडवा झाल्याने वाहतूक ठप्प
Summary

या दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर ट्रक महामार्गावर आडवा पडल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

टेंभुर्णी (सोलापूर) : पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर ट्रक व टँकर यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातातील जखमींना टेंभुर्णी व इंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. या दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर ट्रक महामार्गावर आडवा पडल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. टेंभुर्णी, इंदापूर व महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी व पोलिसांना दिड तासाच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात यश आले.

Accident
टेंभुर्णी : ‘विठ्ठलराव शिंदे’ने दिली १०० टक्के एफआरपी

याविषयी पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर सोलापूरहून पुण्याकडे जाणारा ट्रक (एम एच 25 / यु 4045) व पुण्याकडून सोलापूरकडे जाणारा टँकर (एम एच 14 / सीपी 4020) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये ट्रकमधील तीन जण व टँकरमधील एक जण असे एकूण चार जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील दोन्ही वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की, अपघातातील दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चेंदामेंदा झाला असून अपघात होताच ट्रक महामार्गावर आडवा झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले.

Accident
दोन हजार कोटी आले नगर-टेंभुर्णी महामार्गासाठी, आता लढाई श्रेयासाठी

दरम्यान इंदापूर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व पोलिस तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिस मदतीला आले. या सर्वांनी अपघातील जखमी व मयतांना अपघातग्रस्त वाहनातून बाजूला करून टेंभुर्णी व इंदापूर येथे उपचारासाठी हलविले. तसेच महामार्गावर अपघातग्रस्त ट्रक धडक झाल्याने आडवा पडल्याने महामार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहनांची रांग लागली होती. दिड तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी क्रेनच्या साह्याने महामार्गावरील आडवा पडलेला ट्रक बाजूला करून बंद पडलेली वाहतूक हळूहळू सुरू केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com