Madha Loksabha: माढा लोकसभेत ट्विस्ट! धैर्यशील मोहिते-पाटील हाती घेणार तुतारी?, मोहितेच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले शरद पवार?

Madha Loksabha: धैर्यशील मोहिते पाटील १४ एप्रिलला तुतारी हाती घेणार असून मंगळवारी (ता. १६) शरदचंद्र पवार गटाकडून माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची विश्वसनीय मिळाली आहे.
Madha Loksabha
Madha LoksabhaEsakal

सांगोला: अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (ता. ११) पुण्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतली. त्यानंतर १४ एप्रिलला तुतारी हाती घेणार असून मंगळवारी (ता. १६) शरदचंद्र पवार गटाकडून माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची विश्वसनीय मिळाली आहे. परंतु धैर्यशील मोहिते पाटील मात्र परवाच तुम्हाला सविस्तर सांगतो एवढेच बोलले आहेत.

माढा लोकसभेसाठी सुरवातीपासूनच मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील भाजपकडून इच्छुक होते. परंतु भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. भाजपची उमेदवारी घोषित झाली असली तरीही मोहिते पाटील कुटुंबातील अनेक सदस्य मतदारसंघातील गाव भेटीचा दौरा करीतच होते. आमच ठरलय असे म्हणणारे मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार हे मात्र सांगत नाहीत.

Madha Loksabha
Madha Lok Sabha: माढ्यात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरलं? भाजप सदस्यत्वाचा दिला राजीनामा

गावभेटीत ते आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन सर्वांशी संवाद साधत आहेत. यापूर्वीही त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आज (ता. ११) पुण्यातील मोदी बागेत पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेऊन माढा लोकसभेबाबत चर्चा केली. या बैठकीमध्ये १४ तारखेला धैर्यशील मोहिते पाटील अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून या पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (ता. १६) शरद पवार स्वतः सोलापूर येथे उपस्थित राहून धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.

Madha Loksabha
Sharad Pawar: "मोदी वगळता सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला, राऊत म्हणतात जसे पुतीन तसे..."; शरद पवार काय म्हणाले?

अन्य कुणाचा प्रवेश?

धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले नसेल तर त्यांच्या पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. परंतु या पक्षप्रवेशासाठी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील घराणेतील कोणकोण शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमचं ठरलंय म्हणणारे ठरलेले सांगेनात

अनेक दिवसापासून आमचं ठरलंय म्हणत मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या फोटोसह आमचे ठरलंय असे सतत सांगत उमेदवारी मिळण्यापासून आतापर्यंत ठरलंय एवढेच बोलत आहेत. परंतु शरद पवार यांची दोन वेळा धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेणारे, उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरले असतानाही आमचं ठरलय म्हणणारे ठरलेले सांगत का नाहीत? असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आहे.

Madha Loksabha
Madha Lok Sabha: धैर्यशील मोहिते-पाटलांच्या हाती तुतारी? शरद पवार गटात शनिवारी प्रवेशाची शक्यता; माढ्याच्या उमेदवारीबाबतही चर्चा

धैर्यशील यांची ‘वेट अँड वॉच’चीच भूमिका

शरद पवार यांनी स्वतः धैर्यशील मोहिते पाटील पक्ष प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांना देत असले तरी या पक्षप्रवेशाबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वेट अँड वॉच एवढेच उत्तर दिले. तुम्हाला परवा सविस्तर माहिती कळवितो असेच त्यांनी सांगितले. त्यामुळे धैर्यशील यांचे ‘वेट अँड वॉच’ कोठे थांबणार याचीच उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

धैर्यशील मोहिते पाटलांचा दोन दिवसांत पक्षप्रवेश- शरद पवार

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी चर्चा झालेली नाही, मात्र येत्या दोन दिवसांत ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. विजयदादा मोहिते पाटील हे सध्या शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. तेथील प्रत्येक निर्णय हा त्यांच्या संमतीनेच होतो, असे सांगून पवार यांनी वैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीबाबत अधिक बोलणे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com