Solapur News : दोन कोटी २६ लाख महिलांना अर्ध्या तिकीटाचा लाभ; महामंडळाला १५२ कोटींचे उत्पन्न

राज्य शासनाच्या राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे वर्षभरात महिलांच्या प्रवासात दुप्पटीने वाढ झाली आहे.
दोन कोटी २६ लाख महिलांना अर्ध्या तिकीटाचा लाभ
दोन कोटी २६ लाख महिलांना अर्ध्या तिकीटाचा लाभSakal

सोलापूर : राज्य शासनाच्या राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे वर्षभरात महिलांच्या प्रवासात दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दोन कोटी २६ लाख ७९ हजार महिलांनी याचा लाभ घेतला आहे. यातून महामंडळाला १५२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

राज्य शासनाने २०२३ च्या अंदाजपत्रकात महिलांसाठी विविध योजना जाहीर केल्या. त्यात प्रामुख्याने राज्य परिवहन मंडळाचा अर्ध्या तिकीटाचा महिला सन्मान योजना ही प्रभावी ठरली आहे. राज्यभरात १७ मार्च २०२३ रोजी महिलांचा अर्ध्या तिकीटाचा प्रवास सुरू झाला. ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदायिनी ठरली असून जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी पूरक ठरली आहे.

श्रावण व अधिकमास, नवरात्र या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे अध्यात्मिक पर्यटन वाढविण्यात या योजनेचा मोठा हातभार लागला आहे. त्याचबरोबर आठवडा बाजार, बॅंकेचे व्यवहार आदी कामांसह विविध घरगुती कार्यक्रमांमध्ये महिलांचा वाढता सहभागामुळे दुरावलेल्या नात्यातील ओलावा टिकविण्यास मदत झाले आहे. जिल्ह्यात इतर आगारांच्या तुलनेत बार्शीतील महिलांनी सर्वाधिक प्रवास केल्याचे दिसून येते.

१७ मार्च २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४

आगार -लाभार्थी -उत्पन्न

सोलापूर -२७ लाख ५९ हजार -२७ कोटी ९५ लाख

पंढरपूर- २९ लाख ६३ हजार -२२ कोटी ३३ लाख

बार्शी -३४ लाख ९६ हजार -२२ कोटी २३ लाख

अक्कलकोट -२९ लाख ८ हजार- १६ कोटी ६७ लाख

करमाळा -१८ लाख ५३ हजार - १२ कोटी ५३ लाख

अकलूज- २१ लाख ९३ हजार - १२ कोटी ९८ लाख

सांगोला - २१ लाख ६६ हजार- १२ कोटी ५० लाख

कुर्डूवाडी - १९ लाख ६५ हजार - ११ कोटी ९० लाख

मंगळवेढा -२३ लाख ७१ हजार -१३ कोटी ३७ लाख

राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेचा महिलांनी लाभ घेतला आहे. महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढले आहे. श्रावण, अधिकमास, नवरात्र, एकादशी वारी आदी सणउत्सव काळात देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिला भक्तांची संख्येतही एरव्हीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले.

- अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com