
"आम्ही आहोत तुमच्यासोबत !' रुग्ण, नातेवाईक, रुग्णालयांच्या मदतीसाठी सहा तरुणांची धडपड
सोलापूर : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला (Increasing prevalence of Corona) आळा घालण्यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने अनेक लोक स्वयंस्फूर्तीने मदत करीत आहेत. अशांपैकी एक असलेल्या सहा तरुणांच्या गटाकडून (Group of six friends) "आम्ही आहोत तुमच्यासोबत' हे ब्रीद घेऊन कोरोना युद्धात (Corona War) आपले योगदान देण्याचा प्रयत्न होत आहे. (Uninterrupted service of six young people to help Corona patients and relatives)
हेही वाचा: जागतिक परिचारिका दिन : आयुष्यातील सर्वांत मोठी मृत्यूशी चाललेली लढाई "त्या' लढताहेत निर्धाराने !
सोलापूर शहर व जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. या आपत्तीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. मात्र, हे काम केवळ शासन व प्रशासनाचेच नाही तर यामध्ये लोकसहभागाचीही तितकीच गरज आहे, ही बाब हेरून शहरातील सहा युवक एकत्र आले आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले (मो. 9604567890) यांच्या नेतृत्वाखाली मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक प्रशांत पल्ली (7796488941), राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम (9921340053), सामाजिक कार्यकर्ता राज सलगर (9096138278), सोहन लोंढे (9130565914) व ओम साई प्रतिष्ठानचे अमोल गायकवाड (9637497330) असे एकूण सहाजण एकत्रित येऊन कोव्हिड संदर्भातील सेवा देत आहोत. याकरिता त्यांनी सोशल मीडियावर आपले संपर्क क्रमांक दिले आहेत. त्याच्या आधारे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधतात.
शहराच्या मध्यवर्ती भागातील पार्क नजीकचे ऐश्वर्या हॉटेल हे त्यांच्या संपर्काचे ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळपासून रात्री- अपरात्रीपर्यंत हे तरुण एकत्र असतात. केवळ शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीला नि:स्वार्थपणे धावून जाण्याचे काम ते करीत आहेत.
हेही वाचा: युवकांनी सोडवला माकडांच्या अन्नपाण्याचा प्रश्न ! विविध स्तरांतून सुरू मदतीचा ओघ
कोरोना रुग्णांना सर्वसाधारण बेडबरोबरच ओटू, बायपॅप वा ऑक्सिजन बेडची गरज असते. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांचे यासंदर्भात त्यांना फोन येतात आणि लगेच या तरुणांच्या हालचाली सुरू होतात. शहरात कुठल्या शासकीय वा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत काय, या माहितीच्या आधारे संबंधित रुग्णाला तिथे ऍडमिट करण्याकामी यांचा आटापिटा सुरू असतो. अनेक रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असते. अशा वेळी हॉस्पिटलच्या इन्चार्जशी संपर्क साधून त्यांना इंजेक्शनची व्यवस्था करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
एवढेच नव्हे तर अनेक रुग्णालयांकडून त्यांच्याकडील ऑक्सिजन संपायला आला आहे, त्याची सोय करा, अशीही मागणी होते. यावर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व उपायुक्त आदींशी संपर्क साधून ऑक्सिजनची पूर्तता करण्याकामी त्यांची अखंड धडपड सुरू असते. रुग्णांच्या अन्य व नातेवाइकांच्या अन्य समस्याही सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक रुग्णांचे नातेवाईक आमच्यासाठी राहण्या- जेवणाची सोय करा, अशी मागणी करतात किंवा एसटी स्टॅंडपासून ते रुग्णालयापर्यंत रुग्णाला नेण्यासाठी रिक्षा, ऍम्बुलन्सची सोय करा, अशी विनवणी केली जाते. इथेदेखील ते मदतीला धावून जातात.
कोणताही रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी हे तरुण दक्ष असतात. शहरातील खासगी रुग्णालयात रुग्णांची सोय न झाल्यास शेवटी शासकीय रुग्णालयात दाखल करून त्याचा जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. कोरोनाची ही दुसरी लाट आहे. भावी काळात तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत 18 ते 45 वयोगटातील लोकांना तसेच लहान मुलांनादेखील कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन आगामी काळात काही उपाययोजना करता येतात का, याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाचे संकट दूर होण्याकामी आमच्या परीने शक्य तितके योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यास प्रशासनाची देखील चांगली साथ लाभत आहे. यामुळे आमचा हुरूप वाढला आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आमच्याशी संपर्क केल्यास आवश्यक सुविधा मिळवून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
- विनोद भोसले, नगरसेवक
Web Title: Uninterrupted Service Of Six Young People To Help Corona Patients And
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..