esakal | विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज : ऑक्‍टोबरमध्ये महाविद्यालयीन निवडणुका 
sakal

बोलून बातमी शोधा

College_Election
  • माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी व्यक्‍त केली होती अपेक्षा 
  • ठाकरे सरकारच्या सूचना : उच्च शिक्षण विभाग लागला कामाला 
  • ऑक्‍टोबर- नोव्हेंबरदरम्यान पार पडणार महाविद्यालय अन्‌ विद्यापीठीय निवडणुका 
  • चळवळीतून राजकीय नेतृत्त्व तयार व्हावे असा आहे त्यामागील हेतू 

विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज : ऑक्‍टोबरमध्ये महाविद्यालयीन निवडणुका 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : अकृषिक विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या राज्यातील तीन हजार 132 महाविद्यालयांमध्ये ऑक्‍टोबर- नोव्हेंबरदरम्यान निवडणुका होणार आहेत. फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आता ठाकरे सरकारकडून केली जाणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मागणीनुसार सरकारने उच्च शिक्षण विभागाला कामाला लावले आहे. 


हेही नक्‍की वाचा : भाजप खासदार डॉ. महास्वामींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द 

फडणवीस सरकारने तब्बल 25 वर्षांनंतर महाविद्यालयीन निवडणुकीचा निर्णय घेतला. ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये विद्यापीठांनी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही दिले. मात्र, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह राज्यातील महापूर आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निवडणुकांचा मुहूर्त हुकला. तत्पूर्वी, विद्यापीठाकडून मिळालेल्या पत्रानुसार बहूतांश महाविद्यालयांनी विद्यार्थी मतदारांची यादी तयार केली होती. दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षणापासून राजकीय नेतृत्व पुढे यावे या हेतूने माजी केंदीय मंत्री श्री. पवार यांनी रविवारी (ता. 23) महाविद्यालयीन निवडणुका घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. तत्पूर्वी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही तशी मागणी केली आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने उच्च शिक्षण विभागाला निर्देश दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महाविद्यालयीन निवडणूक कायद्यानुसार विद्यार्थी प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. 


हेही नक्‍की वाचा : डॉ. महास्वामींची खासदारकी गेली तर मी लढणार : ढोबळे 

ठळक बाबी... 

  • महाविद्यालयीन व विद्यापीठीय निवडणुकांचे उच्च शिक्षण विभागाकडून नियोजन 
  • तत्कालीन सरकारच्या निर्णयाची होणार अंमलबजावणी : विद्यापीठांना तयारीची सूचना 
  • महाविद्यालयीन निवडणुकीवर राहणार विद्यापीठांचे नियंत्रण : प्राचार्य निवडणूक प्रमुख 
  • माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अपेक्षेनंतर सुरु झाली प्रक्रिया 
  • शासन स्तरावरुन निर्देश मिळताच तयार होणार मतदार यादी : यंदा निवडणुकीचे ठरले 


हेही नक्‍की वाचा : पोस्टाच्या बचत खात्यात आता पाचशे रुपयांची अट 

परिपत्रक पूर्वीचेच त्याला शासनाची मान्यता हवी 
विद्यापीठांशी संलग्नित राज्यातील तीन हजार 100 महाविद्यालयांमध्ये निवडणूक होईल. तत्कालीन सरकारने निवडणुकीचे परिपत्रक काढले, परंतु मागच्या वर्षी महापुर आणि विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका रद्द कराव्या लागल्या. आता शासनाच्या मान्यतेनुसार ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल. 
- डॉ. मोहन खताळ, सहसंचालक, उच्च शिक्षण 

loading image
go to top