

Unorganized farmers in Solapur protesting the rate disparity and alleged arbitrariness by sugar mills.
Sakal
-संदीप गायकवाड
उ.सोलापूर : जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू केलेल्या ३४ पैकी सहा साखर कारखान्यांनी अधिकृत ऊसदर जाहीर केला आहे. हे सर्व कारखाने पंढरपूर, माढा पट्ट्यातील असून त्यांनी प्रतिटन २,८०० ते २,८७५ रुपये ऊसदर जाहीर केला आहे. सोलापूर शहरालगतच्या तालुक्यांतील कारखान्यांनी अद्याप ऊसदर जाहीर केला नाही. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने प्रतिटन ३०० ते ५०० रुपये कमी दरामुळे शेतकऱ्यांत रोष आहे. मात्र त्या रोषाला आंदोलनाचे स्वरूप देणाऱ्या संघटनाही हतबल ठरल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली उरले नसल्याचे चित्र आहे.