Ladki Bahin Yojana: 'एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद'; उत्पन्नाच्या निकषाची पडताळणीचे नवीन अपडेट..

Ladki Bahin Scheme Eligibility: आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana sakal
Updated on

Summary

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  • एका कुटुंबात दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

  • यापुढे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचीही पडताळणी होणार आहे.

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही अर्ज केले. काहींनी रेशनकार्ड वेगळे असल्याचे सांगितले, वय १८ नसताना देखील अठरा पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले. पण, आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे. आत्तापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com