esakal | Solapur: विषय अनगरचा, पाठिंबा शेटफळ अन्‌ नरखेडचा
sakal

बोलून बातमी शोधा

Vikrant Patil, Vijayraj Dongre, Umesh Patil

गेल्या काही दिवसांमध्ये या तिन्ही गावातील नेत्यांमधील सख्य पाहता अनगरच्या विषयासाठी शेटफळ अन्‌ नरखेडने दिलेला पाठिंबा अनेकांना कोड्यात टाकून गेला आहे.

विषय अनगरचा, पाठिंबा शेटफळ अन्‌ नरखेडचा

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सोलापूर: मोहोळच्या राजकारणात अनगर, शेटफळ आणि नरखेड ही गावे पूर्वीपासून राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात. अनगर व परिसरातील काही वाड्यांच्या नगरपंचायतीचा विषय गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसमोर आला होता. अनगरच्या या महत्वाच्या विषयासाठी शेटफळ आणि नरखेडचा आयत्यावेळी आणि अनपेक्षितपणे पाठिंबा मिळाला. गेल्या काही दिवसांमध्ये या तिन्ही गावातील नेत्यांमधील सख्य पाहता अनगरच्या विषयासाठी शेटफळ अन्‌ नरखेडने दिलेला पाठिंबा अनेकांना कोड्यात टाकून गेला आहे.

हेही वाचा: ढासळलेल्या बालेकिल्ल्यात 'साहेब' तैनात

जिल्हा परिषदेत सध्या अनगर जिल्हा परिषद गटातून विक्रांत पाटील, आष्टी जिल्हा परिषद गटातून विजयराज डोंगरे, नरखेड जिल्हा परिषद गटातून उमेश पाटील हे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. मोहोळ तालुक्‍यातील तीन महत्वाच्या युवा नेत्यांमुळे जिल्हा परिषदेत मोहोळ नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यातच विजयराज डोंगरे यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्‍याला जिल्हा परिषदेत सलग पाच वर्ष अर्थ व बांधकाम सारखी महत्त्वाची समिती मिळाली आहे. मोहोळची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या अनगर व परिसरातील वाड्यांचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी काही दिवसांपूर्वी नगर विकास विभागाने प्राथमिक अधिसूचना जाहीर केली आहे. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव आवश्‍यक आहे.

हेही वाचा: सोलापूर: 'आरटीओ' संजय डोळे सेवानिवृत्त

नगरपंचायत स्थापनेसाठी आवश्‍यक असलेला ठराव घेण्यासाठी हा अनगर व वड्यांचा हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. बैठक संपत असतानाच नरखेडचे सदस्य उमेश पाटील यांनी अध्यक्षांना अनगरच्या विषयाची आठवण करुन दिली. अनगर नगरपंचायत स्थापनेच्या ठरवाला सूचक म्हणून उमेश पाटील तर अनुमोदक म्हणून सभापती विजयराज डोंगरे यांचे नाव आले आहे. अनगरचा विषय असल्याने काय होणार? आणि ते काय म्हणणार? अशीच उत्सुकता काही कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना होती. विषयासाठी असलेल्या सूचक आणि अनुमोदकाचे नाव पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

हेही वाचा: सोलापूर : स्पर्धा परीक्षा घा अन्‌ भरती सुरू करा

विषय तालुक्‍याच्या विकासाचा असेल तर आमचा त्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. नगरपंचायत स्थापनेमुळे अनगर व परिसरातील नागरिकांचा प्रश्‍न सुटणार आहे. चांगल्या सोयी-सुविधा या भागातील नागरिकांना मिळणार आहेत. त्यामुळे आमचा या विषयाला पाठिंबाच असेल, चांगल्या कामासाठी आम्ही नेहमी सोबत असल्याची भूमिका सभापती विजयराज डोंगरे व जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी व्यक्त केली.

loading image
go to top