60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
Summary

एक उत्तम खेळाडू, अधिकारी व पर्यावरणवादी असणाऱ्या विपुल वाघमारे हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

माढा (सोलापूर): राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉलीबॉल अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व उत्तम खेळाडू असणाऱ्या माढयातील विपुल वाघमारे हे युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आयकर उपायुक्त झाल्यानंतर इन्स्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील 60 हुन अधिक गावांमध्ये वृक्षारोपणाची चळवळ पोहचवत आहे. झाडे लावण्याबरोबरच लोकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी जागृत करण्यासाठी प्रबोधनही केले जात आहे. एक उत्तम खेळाडू, अधिकारी व पर्यावरणवादी असणाऱ्या विपुल वाघमारे हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
माढा सबजेलमधून फरार दुसरा कैदीही कुर्डुवाडीमधून ताब्यात !

माढ्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक व माढ्यातील सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतलेल्या विपुल वाघमारे यांनी बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेतले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असतानाच त्यांना ॲथलेटिक्स मध्ये विशेष आवड होती. 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, लांब उडी यासारख्या खेळांमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले‌. याशिवाय हॉलीबॉलचा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ते नावारूपास आले.

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले! शोधमोहीम सुरू

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेंमध्ये वयाच्या केवळ अकराव्या वर्षी त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामुळे त्यांना स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडियाची निवासी स्कॉलरशिपही मिळाली. क्रीडा शिक्षक असलेल्या वडील दिगंबर वाघमारे यांच्याकडून त्यांना खेळाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या कुटुंबातील दोन्ही भावांनी व एक बहिणीने खेळामध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. त्यांनी सात वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धांमध्ये दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविले आहे. तर तीन वेळा आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. एक वेळा शिवाजी विद्यापीठाचे हॉलीबॉल संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषविले आहे.

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
माढा स्टेट बँक ऑफ इंडियाचा कारभार तीनच कर्मचाऱ्यांवर

खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणारी मुलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवताना दिसून येत नाहीत. मात्र विपुल वाघमारे यांची गोष्ट एकदम निराळी होती. त्यांनी महाराष्ट्राच्या हॉलीबॉल संघाचे दहावीमध्ये शिक्षण घेत असताना कर्णधारपद भूषविले होते व त्याच वेळी त्यांनी दहावीला 82 टक्के गुण मिळवले होते तर शिवाजी विद्यापीठाच्या पदवीच्या शेवटच्या वर्षी त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या हॉलीबॉल संघाचे कर्णधारपद भूषवत असतानाच इतिहास विषयात ते विद्यापीठामध्ये प्रथम आले होते. त्यावेळी डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींमध्ये प्रवीण मिळवण्याची नवलाई विपुल वाघमारे यांनी केली. क्रीडा क्षेत्रातील त्यांची चमकदार कामगिरी व त्याचा सतत चढता आलेख असतानाच ते 2007 मध्ये युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. युपीएससीच्या परीक्षेतून आयआरएस झालेले विपुल वाघमारे सध्या पुण्यात आयकर उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत.

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
माढा तालुक्‍यातील गुरुजन धावले मदतीला ! जमा केला दहा लाखांचा निधी

क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणाऱे व आयआरएस झालेल्या वाघमारे यांना पर्यावरणाची आवड असल्याने त्यांनी चार वर्षांपूर्वी माढयामध्ये इन्स्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरण विषयक जनजागृती व लोकांमध्ये व लहान मुलांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण करण्यासाठी युवकांच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली. सध्या इन्स्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील साठहून अधिक गावांमध्ये सात हजार झाडे लावण्यात आली आहेत.

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
42 दिवसांत 634 मुले कोरोनाबाधित ! माढा तालुक्‍यात बाधित मुलांची संख्या लक्षणीय

याशिवाय या प्रत्येक गावांमध्ये इन्स्पायर फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ प्रोजेक्टर, व्हॉट्सऍप ग्रुप, फेसबूक पेज या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृती केली आहे. विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनामध्ये पर्यावरण पूरक सवयी निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले आहे. पर्यावरण मधील सक्सेस स्टोरी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून लोकांपुढे आणण्यात येत आहे.

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
42 दिवसांत 634 मुले कोरोनाबाधित ! माढा तालुक्‍यात बाधित मुलांची संख्या लक्षणीय

माढा शहर हे फुलांचे गाव करण्यासाठी माढयामध्ये दोनशेहून अधिक फुलांची झाडे लावली आहेत. इन्स्पायर फाउंडेशनशी सोलापूर व इतर जिल्ह्यातील शेकडो युवक स्वयंसेवक जोडले गेले असून पर्यावरणाची हे काम शास्त्रीय पद्धतीने व ही चळवळ दीर्घ काळ टिकण्यासाठी त्याला प्रबोधनाची जोड दिली आहे. पर्यावरण विषयक विचार करण्याची सवय व त्यासाठी काम करण्याची प्रेरणा विपुल वाघमारे यांनी युवकांना दिल्याने या कामाने सध्या जोर पकडला आहे.

60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ
माढा, कुर्डुवाडी, टेंभुर्णीला कोव्हिड सेंटर मंजूर ! रुग्णांवर उपचार करणे शक्‍य

उत्तम खेळाडू असण्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी यूपीसीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतील यश आणि आता पर्यावरण विषयक कामांमध्ये मोठी मजल मारलेल्या विपुल वाघमारे यांचे व्यक्तिमत्त्व युवकांना निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. अर्थात त्यांचा हा सगळा प्रवास अनेक खडतर आव्हाने, साधनांची प्रतिकूलता यासारख्या गोष्टींनी भरलेला होता. क्रीडा, शिक्षण, प्रशासकीय अधिकारी व पर्यावरण या चार क्षेत्रात केवळ जिद्द, परिश्रम, चिकाटी, सातत्य व कुटुंबातील सदस्यांचे प्रोत्साहन, युवकांची, ग्रामस्थांची साथ या गोष्टींमुळे यशस्वी वाटचाल करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com