Water News: मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये शेतीला टँकरने पाणी!

म्हैसाळ उपसा सिंचन योजना ठरतेय बिनकामाची
Water News: मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये शेतीला टँकरने पाणी!
Updated on

Water News: सलगर बुद्रुक:सोलापूर जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढ्यातील 19 गावांत शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.आजून उन्हाळा सुरूही झाला नसताना फळबागायतदार शेतकऱ्यांना बहारात असलेल्या द्राक्ष,डाळींब व आंब्यांच्या फळबागांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.हिवाळ्यात ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात खुप भयानक परिस्थिती उदभवेल असे शेतकऱ्यांचे मत आहे.

एक टॅंकरला 3 हजार

-20 हजार लिटर पाणी साठा असलेल्या एका टॅंकरला कमीतकमी 3 हजार रुपये मोजावे लागत आहेत.अंतर वाढले तर 3 हजार 500 ते 4 हजार रुपया पर्यंत खर्च येत आहे.निसर्गाच्या व प्रशासनाच्या अवकृपेच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेऊन

घातल्या शिवाय पर्याय नाही.द्राक्ष व डाळींब बागांचे बहार संपण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे.तोपर्यंत लाखो रुपयांचा बुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.

Water News: मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये शेतीला टँकरने पाणी!
Mumbai Water News: पनवेलमध्ये भीषण पाणी टंचाई ; ३ दिवस परिसरात पाणीबाणी

म्हैसाळ उपसा सिंचन

योजना असून अडचण नसून खोळंबा - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्यातील शेवटच्या लाभक्षेत्रात सदरची मंगळवेढ्यातील 19 गावे येतात.ही गावे टेलला येत असल्याने हेडवर असलेल्या गावांच्या शेतीची तहान भागल्यावरच या गावांना पाणी येत असते.सध्या येवढी दुष्काळी परिस्थिती असून देखील सलगर बुद्रुक सह परिसरातील गावे तहाणलेलीच आहेत.शिवाय गेल्या तीन वर्षांपासून अजूनही सदर योजनेतील लाभ क्षेत्रामधील गावांमध्ये पाणी पुरवठ्याची कामे अपूर्णच आहेत.ही कामे अश्याच गतीने सुरू राहिल्यास अजून दोन तीन वर्षे जातील असे जाणकारांचे मत आहे.

Water News: मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये शेतीला टँकरने पाणी!
Mumbai Water Cut News : मुंबईकरांची पाणीपुरवठ्याची वर्षभराची चिंता मिटली!

1) आप्पासो बिराजदार,शेतकरी सलगर खुर्द-माझी डाळींबाची 600 झाडे आहेत.शेतात तीन बोअर व एक रोजगार हमी योजनेतून घेतलेली विहीर आहे.ओढ्याकडेला शेत आहे.तरीही डाळींब बागेला द्यायला पाणी नाही.त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून टँकरने विकतचे पाणी घेत आहे.

2) महादेव धायगोंडे, शेतकरी सलगर बुद्रुक- आमच्याकडे पपईची बाग आहे.पाणी कमी पडू लागले म्हणून शेततलाव खोदले आहे.व ते शेततलाव विकतच्या पाण्याने भरत आहे.म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा आम्हाला कांहीही उपयोग होत नाही.

Water News: मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये शेतीला टँकरने पाणी!
Water Storage News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com