'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात पंढरपुरात गणरायाचे स्वागत

आनंद व उत्साहाच्या मंगलमयी वातावरणात श्री गणेशाची घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात पंढरपुरात गणरायाचे स्वागत

पंढरपूर (सोलापूर) : 'गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...'च्या जयघोषात घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. आनंद व उत्साहाच्या मंगलमयी वातावरणात शुक्रवारी (ता.10) श्री गणेशाची घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे सकाळपासूनच गणेशभक्तांची लगबग दिसून आली. आपल्या आवडीची गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी विविध स्टॉलला भेट देण्याचा आग्रह बाल गणेश भक्तांकडून होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. आपल्या पसंतीची मूर्ती खरेदी केल्यानंतर गणपती बाप्पा मोरया च्या जल्लोषात घरोघरी गणरायाचे भक्तीभावाने स्वागत करण्यात आले.

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात पंढरपुरात गणरायाचे स्वागत
एक झुंज स्वतःशी!

गणेशोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळानी ढोल ताशा किंवा डॉल्बी स्पीकर न लावता शांततेत मूर्तींची प्रतिष्ठापना केली. यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांकडून अनावश्यक खर्च टाळत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील गावकऱ्यांना 'एक गाव एक गणपती' असा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे.

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात पंढरपुरात गणरायाचे स्वागत
नागझरी नदीपात्रातून दहिटणे हद्दीत 25 लाख किमतीची वाळूचोरी

श्रीगणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बाजारपेठेत वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी शिवाजी चौक ते भादुले चौक, प्रदक्षिणामार्ग चा काही भाग ते नाथ चौक, पंढरपूर अर्बन बँक चौक ते भादुले चौक आदी ठिकाणी वाहन बंदी केली होती. त्यामुळे गणेशभक्तांना मूर्ती खरेदी करताना गर्दी न होता मोकळेपणाने वावरता आले. गणेश पूजेसाठी आवश्यक असणारे फुलांचे हार, नारळ, प्रासादिक वस्तू, अगरबत्ती आदी साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारपेठेत गर्दी दिसून आली. आपल्या लाडक्‍या बाप्पाचे आगमन झाल्यामुळे बाल गणेश भक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत असून पुढील दहा दिवस गणेशोत्सव उत्तरोत्तर रंगत जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com