
-किरण चव्हाण
माढा: माढ्यातील महिलांनी गौरी - गणपतीच्या सणाच्या कामाबरोबरच मुंबईत मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गेलेल्या मराठा समाज बांधवांसाठी चपाती, भाकरी, ठेचा, चिवडा करण्याच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतले असून शहरातून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ मुंबईला वेगवेगळ्या टप्प्यात पाठवले जात आहेत. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबांचं अशी भूमिका माढ्यातील महिलांनी घेत अगोदर समाज बांधवांसाठी मुंबईला पाठवायचे अन्नपदार्थ तयार करण्याच्या कामात गुंतल्या असून त्यानंतर गौरीची सजावट व फराळ करण्याची भूमिका घेतली आहे.