पंढरपूर-विजयपूर रेल्वेमार्गाबाबत राजकीय अनास्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Work on Pandharpur Vijaypur railway line is stalled

पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रबरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात. परंतु त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर-विजयपूर हा 108 किमीचा रेल्वेमार्ग 2014-15 मध्ये मंजूर करून घेतला.

पंढरपूर-विजयपूर रेल्वेमार्गाबाबत राजकीय अनास्था

मंगळवेढा (सोलापूर) : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गाचा सर्व्हे झाला. मात्र राजकीय अनास्थामुळे अद्याप हा मार्ग रखडला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी याप्रश्नी विचार होणार का? असा प्रश्न तालुक्‍यातून विचारला जात आहे.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
 
पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रबरोबर सर्वाधिक जास्त भाविक कर्नाटकातून चालत येतात. परंतु त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर-विजयपूर हा 108 किमीचा रेल्वेमार्ग 2014-15 मध्ये मंजूर करून घेतला. त्यासाठी 1294 कोटी खर्च अपेक्षित होता. त्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गासाठी निधी दिला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप रेंगाळलेल्या अवस्थेत आहे.

Fastag Update : फास्टॅग नसल्याने वरवडे टोलनाक्यावर दोन हजार वाहनांकडून दुप्पट टोल वसूल

या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास आणि पंढरपूर-लोणंद रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूरमार्गे वाढणारे अंतर व खर्च, वेळेची बचत होणार आहे. शिवाय पंढरपूर-मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे, डाळिंब, ज्वारी, साखर व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्‍य होणार आहे. 

विठ्ठलराव शिंदेची निवडणूक बिनविरोध; औपचारिकता बाकी, 21 जागांसाठी 21 अर्ज वैध

विजयपूर-पुणे हे अंतर 374 किमी आहे. मात्र, हा रेल्वे मार्ग झाल्यास हे अंतर 314 किमी होऊन 60 किमी अंतराची बचत होणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर खासदार शरद बनसोडे यांनी नेटाने प्रयत्न करणे आवश्‍यक होते. परंतु त्यांनी देखील त्यामध्ये म्हणावे तसे लक्ष दिले नाही. विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. खासदार महास्वामी यांनी पंढरपूर व फलटण मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केल्याचे माध्यमात आले. पण पंढरपूर-विजयपूरसाठी त्याचे तितके प्रयत्न दिसत नाही. स्व. भारत भालके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या पत्राला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी 4 सप्टेंबर 2020 रोजी उत्तर देत नियमानुसार आवश्‍यक ती कारवाई करण्यासंदर्भात संबंधित रेल्वे बोर्ड संचालकाला पत्राद्वारे कळविले होते. परंतु स्व. आमदार भालके यांच्या अकाली जाण्याने या प्रश्नी पाठपुरावा कोण करणार, असा प्रश्न देखील निर्माण झाला. दरम्यान, या रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता निर्माण झाली. 

सुमारे एक हजार कोटी खर्च
 
या रेल्वेमार्गासाठी विजयपूर व जत येथील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. तसा पाठपुरावा सोलापूरातील खासदार, स्थानिक आमदारांनी केल्यास आणखीन गती मिळू शकते. या मार्गाचे अंतर 108 किमीऐवजी जवळपास 85 किमी इतके होत असून त्याचा खर्च एक हजार कोटी आसपास होऊ शकतो. त्यासाठी कोकण रेल्वेप्रमाणे राज्य शासनाने यामध्ये आर्थिक हातभार लावला तर हा प्रश्न मार्गी लावू शकतो, असे मत रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. मात्र, यासाठी गरज आहे, ती राजकीय इच्छाशक्तीची 

या रेल्वे मार्गासाठी वर्षभरापासून स्व. भारत भालके यांनी पाठपुरावा सुरू केला होता. परंतु त्यांच्या अकाली जाण्याने हे काम रखडले आहे. आता त्यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जावू. 
- मुजमिल काझी, शहराध्यक्ष, मंगळवेढा, राष्ट्रवादी कॉग्रेस

Web Title: Work Pandharpur Vijaypur Railway Line Stalled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..