MLA shahajibapu Patil and DCM Eknath Shinde
sakal
सांगोला - सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षासह विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे सांगोला तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. सांगोला तालुक्यातून सुमारे १०० वाहनांच्या ताफ्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले.