Solapur Crime
सोलापूर
Solapur Crime: 'दारूला पैसे न दिल्याने तरुणावर सत्तूरने वार'; संशयिताविरुद्ध पूर्वीचे आठ गुन्हे; तडीपारीचीही झाली होती कारवाई
Madha Taluka Shock: पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शाहरूख तांबोळी याच्याविरूद्ध पूर्वीचे आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे तडीपारीची कारवाई देखील केली होती. तडीपारीचा कालावधी पूर्ण करून सध्या तो सोलापुरात आला आहे.
सोलापूर: दारू प्यायला पैसे मागितल्यावर नकार दिल्याने आलम उर्फ शाहरूख इसाक तांबोळी (रा. सरवदे नगर, मुळेगाव रोड, सोलापूर) याने जयराम चाँदसाब जमादार (रा. सग्गम नगर) या तरुणावर सत्तूरे वार केला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.