
सोलापूर : जिल्ह्यातील ५४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्टी तयार केली जाते. हा अवैध व्यवसाय आता पारंपारिक झाला असून एका पिढीनंतर आता तरुणही या अवैध व्यवसायात उतरले आहेत. तरूणांच्या हाताला कोणता रोजगार नाही, बॅंकांकडून अर्थसहाय्यही मिळत नाही. त्यांच्यात शिक्षणाचा अभाव, सरकारी नोकरीबद्दल माहिती नाही, रोजगार मेळाव्यांबद्दल अनभिज्ञ असल्याची कारणे आहेत. त्यामुळे शेकडो तरुण हातभट्टीच्या अवैध व्यवसायात उतरत आहेत. पूर्वी त्यांच्यासाठी रोजगार मेळावे व्हायचे, पण आता त्यासाठी पोलिसांचा पुढाकार दिसत नाही.