सोलापुरातील नागरिकांना हवे 24X7 (Video)

सुस्मिता वडतिले
Monday, 20 January 2020

राज्याचेमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाइट लाइफ सुरू करण्याची घोषणा केली. दरम्यान, पुण्यातही मागणी झाल्यास सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या यादीत असलेल्या सोलापुरातही नाइट लाइफ सुरू करावे. सोलापुरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, सिनेमागृह, मॉल 24 तास सुरू ठेवल्यास व्यापारात वाढ होईल, असे पदाधिकारी म्हणणे आहे.

सोलापूर : सध्या राज्यात गाजत असलेले नाइट लाइफचे लोण सोलापुरात आले आहे. मुंबईप्रमाणे सोलापुरात नाइट लाइफचा प्रयोग झाल्यास व्यापाराला चालना मिळेल, असा दावा कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, भाजपने यास विरोध केला आहे. 
राज्याचेमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाइट लाइफ सुरू करण्याची घोषणा केली. दरम्यान, पुण्यातही मागणी झाल्यास सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या यादीत असलेल्या सोलापुरातही नाइट लाइफ सुरू करावे. सोलापुरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, सिनेमागृह, मॉल 24 तास सुरू ठेवल्यास व्यापारात वाढ होईल, असे पदाधिकारी म्हणणे आहे. 

हेही वाचा- #Union Budget 2020 : इलेक्ट्रिक वाहनांना बळ देण्याची गरज
का हवे नाइट लाइफ
वास्तविक पाहता सोलापूर शहरातील रस्त्यावर रात्री 12नंतरचा शुकशुकाट, गरजेच्या वेळी डफरीन चौक आणि पोलिस स्टेशन वगळता बंद असलेले पेट्रोल पंप, प्रवाशांकडून दुप्पट-तिपट भाडे घेणारे रिक्षाचालक, रात्री 12 नंतर हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांची होणारी उपासमार, पेंशट अत्यावस्थ असताना मेडिकलची असुविधा, सद्यस्थितीत अपुरी असलेली परिवहन सेवा, अशा अनेक कारणांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सोलापूर विस्तीर्ण शहर असून लोकसंख्या जास्त आहे. यामुळे नाइट लाइफ सुरू झाले तर अनेकांना उपयोग होईल. 
 

मनीष काळजे (शिवसेना युवा अध्यक्ष) : सोलापूर शहरात नाइट लाइफ सुरू केल्यास व्यापाऱ्यांना फायदा होईल. शहरातील हॉटेल्स, मेडिकल्सना कायद्यानुसार नियम, अटी लागू केल्यास कल्पना उत्तम ठरू शकेल. कल्पनेचे स्वागत करून नाइट लाइफकरिता आम्ही प्रयत्न करू. 
 
बाबा करगुळे (कॉंग्रेस युवा अध्यक्ष) : मुंबईची सुरुवात रात्रीपासूनच होते. मुंबईप्रमाणेच सोलापूर शहरात नाइट लाइफ सुरू करावे. शहरातील हॉटेल्स, मॉल्स 24 तास खुले झाले तर नागरिक रात्रीचे शहर पाहतील. 

झुबेर बागवान (राष्ट्रवादी युवा अध्यक्ष) : मुंबईप्रमाणेच सोलापूर शहरात शासनाने परवानगी दिली तर नाइट लाइफ सुरू केलेच पाहिजे. त्यामुळे रात्री व्यापारांना व्यवसायात चालना मिळण्यास मदत होईल. त्यानिमित्त रात्री हॉटेल्स, कॅन्टिनला जाण्यास नागरिक बाहेर पडतील. 
 
गजानन भाकरे (भाजप युवा अध्यक्ष) : सोलापूर शहर आध्यात्मिक पर्यटन केंद्र असून ते नावारूपास येत आहे. नाइट लाइफ तसेच उत्तमप्रकारे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन केंद्र करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. 
 
कांचना वानखेडे : सोलापूर शहर विस्तीर्ण असून लोकसंख्या जास्त आहे. शहरातून रात्री अपरात्री नागरिक प्रवास करतात. नाइट लाइफ सुरू केल्यास गरजेनुसार सोयीसुविधा मिळतील. शहरातील लोकसंख्येच्या मानाने सुविधा कमीच आहेत. 

अंबिका जाधव : मुंबईप्रमाणे सोलापूर शहरात नाइट लाइफची संकल्पना सुरू केली तर खूप चांगले आहे. सोलापूरकडे पर्यटन स्थळ असून अनेक पर्यटक येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यात मेडिकल असो वा पेट्रोलपंप, चांगल्या सुविधा देणे आपले कर्तव्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapuri citizens also want nightlife