वाड्यात भुताटकी, गावदेवी बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस 

wada.
wada.

वाडा: -पुरोगामी महाराष्ट्रात आजही भगत बुंवावर विश्वास ठेवणा-यांची संख्या काही कमी नाही. याचा अनुभव वाडा तालुक्यातील केळठण या सुशिक्षित समजल्या जाणा-या गावामध्ये घडला आहे. गावांमधील महिला पोलिस पाटील नम्रता पाटील यांनीच गावदेवीची बांधणी केली असून, त्यामुळे गावातील लोकांना त्रास होत असल्याचे भाकीत तथाकथित भगतांने केले. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली. या अंधश्रद्धेच्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. 

यशवंत पाटील (55) व विशाल पाटील (20) अशी आरोपींची नावे असून, अजुनही या प्रकरणात वीस किंवा त्याहून अधिक आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.  

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील केळठण या गावामधील रहिवाशी यशवंत पाटील यांच्या कुटुंबाला सतत कोणता न कोणता त्रास होत असल्याने त्यांना आपल्याच कुलदैवतांवर संशय होता. आपले देव कुणीतरी बांधलेत या शंकेने त्यांना पछाडले. देवांची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी गावामध्ये कुलदैवतांचा गोंधळ मंगळवारी (2 एप्रिल) आयोजित केला. या कार्यक्रमासाठी त्यांनी बाहेरगावाहून सात भगतांना बोलावले होते. रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत हा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी याच गावातील विशाल पाटील या तरुणाच्या अंगात देव आला आहे, असे भासवून त्याने घुमायला सुरुवात केली. त्याने घुमता - घुमता, ' आपल्या गावदेवीची बांधणी पोलिस पाटील बाईने केली आहे. त्यामुळे सगळ्याच गावाला त्रास होत आहे. तसेच या बाईने गावदेवीच्या मंदिरात दोन नारळ व त्यावर हिरवा कपडा टाकून तोडगा केला आहे ' असे त्याने सांगितले. त्यामुळे एकच खळबळ माजली. पोलिस पाटील बाई अपशकुनी आहे व तिनेच हे सारे कृत्य केल्याची चर्चा सुरु झाली. या प्रकारामुळे पोलिस पाटील नम्रता पाटील यांची बदनामी झाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. 

या तक्रारींच्या अनुषंगाने वाडा पोलिस ठाण्यात भादवी कलम 34, 500 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013 च्या कलम 32), 3(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद बोराडे हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com