
सोयाबीनला मिळणारा भाव घसरून फक्त ₹४,४०० प्रती क्विंटल इतका राहिला आहे.
esakal
दृष्टिक्षेप
शासनाने प्रतिक्विंटल ५ हजार ३२८ हमीभाव जाहीर केला आहे. मात्र अद्यापही खरेदी केंद्रे सुरू नाहीत.
आज रोजी सोयाबीनला प्रतिक्विंटल दर ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपये १० फॅटला आहे.
अवेळी मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले.
Soybean Rate : पोपट पाटील : अवेळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. शासनाने सोयाबीनसाठी ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असतानाही अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या ४ हजार ४०० रुपयांमध्ये खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पदरात तोटा आणि डोळ्यांत अश्रू आहेत.