प्रकाशाच्या सणासाठी राबताहेत 'विशेष हात'

Special-Kids
Special-Kids
Updated on

कोल्हापूर : अपंगावर मात करत, नेटाने उभे राहायचे असा ध्यास घेतलेल्या विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेत सध्या दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. आपल्या जीवनातील अंधार दूर करून समाजात प्रकाश निर्माण करण्यासाठी आकाश कंदील, उटणे, पणत्या तयार करण्यास या विशेष मुलांनी सुरवात केली आहे. 

जिज्ञासा विकास मंदिर आणि राही पुनर्वसन केंद्र, प्रौढ विशेष मुलांची कार्यशाळा ही गेली 28 वर्ष या विशेष मुलांसाठी काम करते. केवळ शिक्षण नाही, तर या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत आहे. साधारणतः दिवाळीच्या चार महिना आधी ही मुले पणती रंगवणे, आकाश कंदील तयार करणे, उटणे तयार करण्याचा कामात मग्न असतात.

निळा, पिवळा, केसरी, जांभळा असे रंग त्यांच्या जीवनात रंग भरण्याचे काम करतात. सकाळी शाळेला आले की पहिलं आवडीचं काम म्हणजे पणती रंगवणे, आकाश कंदील बनवण्यासाठी कागद कापणे, उटणे तयार करून पॅकिंग करणे. दिवाळी सण म्हणजे यांच्यासाठी विशेष पर्वणीचाच जणू. वेगवेगळे रंग आणि एकत्र मिळून काम यामुळे या मुलांचा दिवस प्रत्येक दिवस आनंदात आणि आवडीचे काम करण्यात जातो.

प्रत्येकाच्या जीवनात सणाच्या निमित्ताने प्रकाश आणणाऱ्या या मुलांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याची आता गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे आले पाहिजे. त्यांनी तयार केलेली वस्तू खरेदी करून या मुलांच्या आयुष्यात आणखी एक प्रकाशाचा किरण आपण आणू शकतो. दिवाळीच्या निमित्ताने आपण अनेक वस्तू खरेदी करतो. या विशेष मुलांनी तयार केलेली वस्तू खरेदी करून या मुलांच्या कार्य-कर्तृत्वाला आपण नक्कीच प्रोत्साहन देण्याचे काम करू शकतो.

विशेष मुलांच्यात ही काही तरी करण्याची जिद्द असते. आणि या जिद्दीला बळ देण्याचे काम या संस्थेत होते. यातूनच या मुलांच्या हातातून अशा अनेक सुंदर सुंदर वस्तू साकारतात. अशा मुलांनी तयार केलेल्या या वस्तूला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतो.
- स्मिता दीक्षित, संस्थापिका, जिज्ञासा विशेष मुलांची शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Here saranjam Estate Land
Gold Smuggling
Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Marathi News Esakal
www.esakal.com