esakal | लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचा वसा जपणारी बेळगावची नवदुर्गा
sakal

बोलून बातमी शोधा

special story of navdurga sujata magdum in belgaum helps to traditional actors in work it

अंगात कलागुण असल्यामुळे या क्षेत्रात उतरून रंग कलाश्री ग्रामीण सेवा संघ व महिला संघ स्थापन केले.

लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचा वसा जपणारी बेळगावची नवदुर्गा

sakal_logo
By
राजेंद्र कोळी

चिक्कोडी : भारतीय संस्कृती व परंपरेत महिलांना आदराचे स्थान आहे. त्यांना स्वातंत्र्य व हक्क दिला तरच सबला बनून काम करण्यास समर्थ होतील, यात शंका नाही. लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचा वसा घेऊन अंगभूत कौशल्याच्या आधारे धुळगणवाडी येथील (ता. चिक्कोडी) सुजाता मगदूम यांनी समाजकार्यात पुढाकार घेतला आहे. 

हेही वाचा - ‘यायला लागतय’ म्हटले की दुचाकी गाडी घेऊन तयार असणाऱ्या ट्रक मेकॅनिक ते परिवहन सभापतीचा प्रवास -

समाजपरिवर्तनासाठी शासनाने कितीही योजना राबवल्या, कायदे व नियम केले तरी नागरिकांपर्यंत जागृती होत नाही. हेच हेरून त्यांनी शेकडो पथनाट्ये, लोकसंगीत, स्वच्छता अभियान, साक्षरता अभियान, अस्पृश्‍यता निवारण यासह सरकारच्या विविध जागृती मोहिमांतून सहभाग दाखवला आहे. 

धुळगणवाडीतील बाळाप्पा मगदूम या शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या सुजाता यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सामाजिक कार्याची ओढ व अंगात कलागुण असल्यामुळे या क्षेत्रात उतरून रंग कलाश्री ग्रामीण सेवा संघ व महिला संघ स्थापन केले. राज्यभरातील अनेक उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हा पातळीवरील पुरस्कार देऊन गौरविले आहे. राष्ट्रीय पातळीवरील युवा पुरस्कार विजेते भरत कलाचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करण्याची संधी व बळ मिळाल्याचे सुजाता मगदूम यांनी सांगितले.

हेही वाचा - चालक कम बॉडीगार्ड अशा दुहेरी भूमिकेतील डेअरिंगबाज सारथी लतिका -

सांस्कृतिक कार्यक्रमांचीही जोड

नेहरू युवा केंद्र, युवा सबलीकरण व क्रीडाखाते, माहिती व प्रसारण खात्यासह विविध खात्यांतील आरोग्य, पर्यावरण, अनिष्ठ रूढी, वृक्षारोपण, शौचालय निर्मिती, प्लास्टिकमुक्ती, मादक पदार्थ निषेध, बालविवाह, हुंडाबळी, बालमजूर निर्मूलनपर उपक्रम तालुकाभर राबविले. महिला सबलीकरणासाठी शिवणकाम, संगणक, मेंदी डिझायनिंग प्रशिक्षण दिले. 

"जनजागृतीद्वारे समाजप्रबोधन करून जास्तीत जास्त लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण धडपडत आहोत. त्यास यश मिळाल्याचे समाधान वाटते."

- सुजाता मगदूम, धुळगणवाडी

संपादन - स्नेहल कदम 

loading image