

Bloodshed on Kupwad-Savli Road as Speeding Dumper Runs Over Two Riders
esakal
कुपवाड : कुपवाड-सावळी मार्गावरील विहानराजे मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.१७) दुपारी बाराच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपर चालक वाहनासहीत पसार झाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून डंपर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध दुपारपासून सुरू आहे. पंडित रंगराव पवार (वय ४५, रा. तानंग, ता. मिरज) व पांडुरंग लक्ष्मण कांबळे (वय ४२, रा. सावळी, ता. मिरज) अशी अपघातील मृतांची नावे आहेत.