कश्यामुऴे आले , स्पोर्टस्‌ कपड्यांना सुगीचे दिवस...?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

काही वर्षांत संघाचे टी शर्ट घालून खेळण्याकडे विद्यार्थी , खेळाडूंचा कल वाढला आहे. विविध प्रकारच्या आकर्षक टी शर्टना खेळाडूंची पसंती मिळत आहे

इचलकरंजी ( काेल्हापूर ) : शहर व ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धांना सुरवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आपापल्या संघाच्या नावाचे स्पोर्टस्‌ टी शर्ट बनवत असून स्पोर्टस्‌ कपड्यांना सुगीचे दिवस आले आहेत. क्रीडा स्पर्धामध्ये अलीकडच्या काळात संघभावना दृढ होण्यासाठी स्पोर्टस्‌ टी शर्टना पसंती दिली जात आहे. यंदा टी शर्ट व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे टी शर्टच्या किमती २० ते २५ टक्‍क्‍यांनी कमी आहेत. 

 हेही वाचा - फिटनेसाठी नदीचा ‘नाद’ करणारा ‘अवलिया’
 

खेळाडूंची अशीही पसंती 

काही वर्षांत संघाचे टी शर्ट घालून खेळण्याकडे विद्यार्थी , खेळाडूंचा कल वाढला आहे. विविध प्रकारच्या आकर्षक टी शर्टना खेळाडूंची पसंती मिळत आहे. पावसाळ्यात स्पोर्टस्‌ टी शर्टना कमी प्रतिसाद असतो. पावसाळ्यानंतर मे महिन्यापर्यंत टी शर्टना मागणी असते. अनेक संघांना अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती अर्थसहाय्य व प्रायोजकत्व देतात. यामुळे कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल आदी खेळासाठी अनेक चांगले संघ असे टी शर्ट छापून घेतात.

 हेही वाचा - इलेस्ट्रेशन’ हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे तरी काय ? जाणून घ्या
 

गणवेशासाठी खेळाडूंची हौस

खेळाडू क्रमांक, नाव, संघाचे चिन्ह असलेल्या टी शर्टना संघ खेळाडूंकडून पसंती मिळत आहे. साधारण ८५ रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत चांगल्या प्रतीच्या कापडाचे टी शर्ट छपाई करून मिळत आहेत . भारतीय बनावटीच्या राईस, हनीकॉम, डॉटनेट, ड्रायसीट अशा विविध प्रकारचे कापड टी शर्टसाठी लागते. टोझरा या कापडापासून टी शर्ट तयार केले जातात. या टी शर्टची किंमत ८५ ते १३० रुपये आहे.

 हे नक्की वाचा - काय आहे हे फ्युजन फुड ? -

सुपर पॉली कापडाला सर्वाधिक पसंती

क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खोखो, फुटबॉल आदी खेळात खेळाडू जखमी होतात. त्यामुळे जाड असणाऱ्या सुपर पॉली कापडाच्या टी शर्टची मागणी संघ खेळाडू करतात. चीनमध्ये पाण्याच्या बाटल्यांच्या प्लास्टिकपासून या कापडाची निर्मिती होते. प्रिटिंगच्या दर्जानुसार १५० ते ३५० रुपयांपर्यंत या कापडाचे टी शर्ट उपलब्ध आहेत.

 

मागणी वाढली स्पोर्टस्‌ टी शर्टना

संघभावना व संघाचा नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने क्रीडा स्पर्धेत स्पोर्टस्‌ टी शर्टना मागणी वाढली आहे. या दिवसांत प्रत्येक शाळेतून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ऑर्डर देतात. 
- संदीप पाटील, स्पोर्टस्‌ कापड व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sportswear Fashion Trend In Ichlkarnji