यशवंतरावांचा `सांगावा` देत सोनहिरा खोऱ्यात धावतेय एसटी

स्वप्निल पवार
बुधवार, 11 मार्च 2020

देवराष्ट्रे  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या आजोळ देवराष्ट्रे आणि कर्मभुमी कऱ्हाडला जोडणारी देवराष्ट्रे-कराड एसटी गाडी गेल्या आठ वर्षापासून अखंडितपणे सेवा देत आहे. यशवंतरावाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ही गाडी सुरु करण्यासाठी दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी पुढाकार घेतला होता. आता ही "एसटी' या दोन्ही नेत्यांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी जपत सोनहिरा खोऱ्यातील गावागावातील मुले शिक्षणासाठी कऱ्हाडला नेत आहे. जणू "शिका आणि मोठे व्हा' असा यशवंतरावांच्या सांगावाच घराघरात पोहचवत आहे.

हे वाचा- रेकिंग...मुलाने केला आई-वडिल आणि बहिणीचा खून

यशवंतरावांचे आजोळ आणि जन्मगाव देवराष्ट्रे. शिक्षणासाठी ते कऱ्हाडला असायचे तेव्हा आजोळी त्या काळात एसटी नसल्याने पायी यावे लागायचे. त्यांच्या "कृष्णाकाठ' या आत्मचरित्रात ते म्हणतात,"" मला आई आठवली की देवराष्ट्रे आणि सोनाहिरा आठवतो.'' त्यांच्या बालपणातील अनेक आठवणींना त्यांनी कृष्णाकाठमध्ये उजाळा दिला आहे. आजही सोनहिरा खोऱ्यातील खेडोपाड्यात यशवंतरावांच्या स्मृती विविध उपक्रमांच्या रुपाने जपल्या जातात.

हे वाचा- महिला दिनी डावलले म्हणून....

यशवंतरावांच्या 12 मार्च 2013 रोजीच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने तत्कालीन आघाडी शासनाने सोनहिरा खोऱ्यात विविध उपक्रम व विकासकामे केली. त्यावेळी तत्कालीन वनमंत्री कदम यांनी देवराष्ट्रे-कऱ्हाड एसटी गाडीची संकल्पना मांडली. आज कऱ्हाडला जाण्यासाठी अशा काही स्वतंत्र एसटीची गरज नाही कारण अनेक पर्याय पुढे आले असूनही अशी गाडी सुरु करण्यामागे कदम यांचा यशवंतरावांप्रती असलेला तो जिव्हाळा होता.

हे वाचा- सांगली महापालिकेत या ठरावावरुन गदारोळ

आपल्या राजकिय कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात " गाव तेथे एसटी' हे ब्रीद घेऊन महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहचलेल्या कदम यांनी हेतूपुर्वक अशी घोषणा तेव्हा केली होती. सोनहिरा खोऱ्यातील मोहित्यांचे वडगाव, पाडळी, आसद, चिंचणी, वाजेगाव, सोनकिरे, शिरसगाव, सोनसळ अशा गावागावातून जाणारी ही एसटी गावागावातील मुले कऱ्हाडला शिक्षणासाठी घेऊन जाते. या मुलांमधूनच उद्याचा आणखी एखादा यशंवत जन्मास यावा. या भूमीचा उध्दार त्याच्या हातून व्हावा अशी जणू पतंगरावांची इच्छा असावी. आज अखंडितपणे गेली आठ वर्षे ही मुले घेत एसटी कऱ्हाडला जात आहे. जणू काही यशवंतरावांच्या कार्यकर्तुत्वाचा सांगावाच घेऊनच ती जात आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST running with Message of Yashwantrao in Sonohira Valley