Sangli ST News : शालेय सहलींनी एसटीला तारले; अवघ्या नोव्हेंबरमध्ये १० कोटी ८५ लाखांचे घवघवीत उत्पन्न
ST Corporation Earns : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयामुळे शालेय सहलींसाठी नव्या कोऱ्या एसटी बस उपलब्ध झाल्या असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या सहभागात व महामंडळाच्या उत्पन्नात दिसून येत आहे
नवेखेड : एस.टी.मार्फत शैक्षणिक सहलींना शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.