esakal | Sakal Impact : बेळगावात रोखली मांजा विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Strict warning to cat sellers do not sale cat sells in belgium the impact of sakal news

मांजा विक्री आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले होते.

Sakal Impact : बेळगावात रोखली मांजा विक्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : धारदार मांजा दोऱ्यामुळे दरवर्षी अनेकजण जखमी होत आहेत. तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. मांजा विक्री आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ‘पतंगाचा मांजा करतोय घात’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने सोमवारी (२१) वृत्त प्रसिद्ध केले होते. याची पोलिस खात्याने गांभीर्याने दखल घेतली असून पतंग आणि मांजा विक्री दुकानदारांना मांजा न विकण्याची सक्‍त ताकीद दिली आहे.

हेही वाचा - प्रवाशांनो व्यवहार करा कॅशलेस ; ॲप आले मदतीला 

चार दिवसांपूर्वी दुचाकीवरुन जाताना गळ्याला पतंगाचा मांजा लागल्याने तरुण जखमी झाल्याची घटना गांधीनगर ब्रिजवर घडली होती. यात राहुल राजगोळकर या तरुणाच्या गळ्यात मांजा अडकल्याने त्याचा गळा चिरला. मात्र प्रसंगावधान राखत त्याने दुचाकी थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली. यापूर्वीही मांजामुळे अनेक जणांचे गळे चिरले आहेत. त्यामुळे जीवघेण्या मांजा विक्री आणि वापरावर बंदी घालावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येते. परंतु, त्याकडे पोलिसांनी कानाडोळा केला होता. बहुतेक ठिकाणी चिनी व नायलॉन मांजा वापरण्यात येत असल्याने या दुर्घटना घडत आहेत.

चिनी, नायलॉन, सिंथेटीक मांजा वापरण्याकडे कल वाढला आहे. मात्र, या मांजामुळे अनेक वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मांजामुळे पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. शहरात पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, शहापूर, अनगोळ आदी ठिकाणी मांजाची विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. दुकानदार दुकानाबाहेर साधा दोरा ठेवतात. मात्र, ग्राहकाने मागणी केल्यानंतर चिनी किंवा नायलॉन मांजा दिला जातो. दुसऱ्याचा पंतग कापण्यासाठी मुले मांजाचा वापर करत आहेत, पण हा मांजा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रसिध्द करताच पोलिस खाते खडबडून जागे झाले आहे. व्यापाऱ्यांना मांजा न विक्री करण्याची सक्‍त सूचना करण्यात येत आहे. 

हेही वाचा - आजपासून सुरु होणार कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ; प्रवासीसंख्येवरुन बसेसची संख्या वाढवली जाणार

"मांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सक्‍त सूचना करण्यात येत आहेत. पोलिस अधिकारी दुकानांना भेटी देऊन पाहणी करत आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटिसा पाठवून कायदेशीर कारवाई केली जाईल. यापुढेही मांजाविरोधातील कारवाई सुरुच राहील."

-डॉ. विक्रम आमटे, पोलिस उपायुक्‍त

संपादन - स्नेहल कदम