बेळगाव : परराज्यात परतलेल्या मुलांसाठी शिक्षण खात्याची महत्वाची मोहीम

students from other state education department take decision in belgaum
students from other state education department take decision in belgaum

बेळगाव : शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र कोरोनामुळे आपल्या राज्यात परत गेलेल्या मुलांची माहिती मिळविताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुलांची माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध राज्यात परतलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, इतर राज्यातील शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट वेळेत पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. 

दरवेळी शिक्षण खात्यातर्फे करण्यात येणारे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण यावेळी पहिल्यांदाच पंचायतराज खात्याकडून केले जात आहे. मात्र सर्वेक्षण करताना अनेक समस्या निर्माण होत असल्याने सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे बेळगाव शहर आणि परिसरात विविध कामांसाठी व व्यवसायाच्यानिमित्ताने वास्तव्य करुन असणाऱ्या कामगारांनी आपल्या कुंटुबासह मूळगावची वाट धरली आहे. त्यामुळे उद्यमबाग, मच्छे, पिरनवाडी, होनगा, काकती, हिंडलगा व शहराच्या विविध भागातील मराठी व कन्नड शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही घरी परतले आहेत.

सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अनेकजण आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड व इतर राज्यात परत गेले असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे यंदा शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कोरानामुळे परराज्यात परतलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आव्हान शिक्षण खात्यासमोर आहे. जानेवारीपासून शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून शाळेत प्रवेश घेतलेले अनेक विद्यार्थी कोठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहेत.

सर्वेक्षणासाठी मुदत वाढवून देत फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्‍तीचे शिक्षण देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र कोरोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर अनेक परप्रांतीय आपल्या कुटुंबियांसमवेत मूळगावी परतले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे. त्यामुळे गरज पडल्यास विविध भागातील शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

हेही वाचा - ...तोपर्यंत केसरकर भाजपमध्ये जाणार नाहीत, दिशाभूल थांबवा ; राणेंवरून शिवसेना नेत्याचा सल्ला -

"कोरोना संकटामुळे जे विद्यार्थी आपल्या मूळगावी परतले आहेत, ते विद्यार्थी परत येण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आपल्या गावातील शाळेत प्रवेश घेत आहेत, त्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट वेळेत पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अधिकृत माहिती मिळणार आहे."

- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com