सांगली :आधी अंदाजपत्रकाचा अभ्यास करा !

महापौर सुर्यवंशी यांचे निधीवरून विरोधकांना प्रत्युत्तर
महापौर सुर्यवंशी
महापौर सुर्यवंशीsakal

सांगली ः महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात भाजप सदस्यांना निधी दिला नसल्याचा आरोप चुकीचा आहे. प्रभाग निहाय निधीची तरतूद केली आहे. कोणत्याही सदस्यांची बायनेम कामे न धरता विकासाचा दृष्टीकोण ठेवून निधी वाटप केले आहे. सदस्यांनी आधी अंदाजपत्रकाचा परिपूर्ण अभ्यास करावा असा सल्ला महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिला.

ते म्हणाले,‘‘ महत्वाचे चौक सुशोभिकरण, महत्वाचे रस्ते दुरुस्ती व नव्याने करणे अशी कामे आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळा सांगली व मिरज शहरात उभी करण्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. स्टेशन चौक येथील सुशोभिकरणासाठी एक कोटींची तरतूद केली आहे. वसंतदादा व विष्णूआण्णा स्मारक परिसरासाठी १० लाख तरतूद आहे. प्रशासनाकडून व स्थायी समितीकडून सूचविणेत आलेल्या अंदाजपत्रकामध्ये कोणताही बदल केलेला नाही.’’

महापौर सुर्यवंशी
PM मोदींचा अमेरिका दौरा; पहिल्याच दिवशी उद्योगपतींशी चर्चा

ते म्हणाले,‘‘ बायपास ते मधवनगर नाका जुना बुधगांव रोड हा का झाला नाही असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सदस्यांकडेच उपमहापौर पदाची जबाबदारी होती. त्यांच्या काळामध्ये महानगरपालिकेस १०० कोटींचा विशेष निधी प्राप्त झालेला होता. त्यावेळेस सदरची कामे का प्रस्तावीत केली गेली नाहीत. तसेच कुपवाड गावठाण येथील रस्ता सध्याच्या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित न करण्याचे प्रमुख कारण म्हणजे कुपवाड शहरातील ड्रेनेज व्यवस्था निर्माण करणेसाठी शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर होणारी खुदाई होणार आहे. बामणोली ते कुपवाड हा वाहतुकीस अडथळा न होण्याच्या दृष्टीने ६० फूटी रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

ते म्हणाले,‘‘ सर्वांना विश्वासात घेऊन व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच अंदाजपत्रक केले आहे. उपमहापौरांनी सूचक म्हणून स्वाक्षरीही केलेली आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडणार नाही. गरज पडल्यास चौमाही अंदाजपत्रकामध्ये तदतूद केली जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com