संघर्षातून यशाचा राजमार्ग शोधणाऱ्या सुधीरची वर्ल्ड पॅन्क्रिशन स्पर्धेसाठी निवड

Sudhir Pundekar
Sudhir Pundekar

सातारा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत फलटण तालुक्‍यातील मुळीवाडी या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुधीर हणमंत पुंडेकर याची रोम (इटली) येथे जागतिक कुस्ती संघटनेच्या वर्ल्ड पॅन्क्रिशन अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 12 ते 18 नोव्हेंबर कालावधीत रोम येथे होणार आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (Uww) जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यताप्राप्त वर्ल्ड पॅन्क्रिशन अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत सुधीर 84 किलो वजन गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
 
सुधीरने यापूर्वी श्रीलंका, बेलारूस येथील आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत यश मिळवले आहे. सन 2017 तुर्कस्तानची राजधानी आश्‍काबाद येथे पार झालेल्या पाचव्या इंडोअर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत बेस्ट रेसलिंग (कुस्ती) या खेळात कौशल्य सिद्ध केले आहे. या स्पर्धेत रशिया, हंगेरी, स्वित्झर्लंड, बेलारूस, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्थान, युक्रेन, युएसए, जर्मनी, इटली, बल्गेरिया यासह 30 देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी एनआयएस कुस्ती प्रशिक्षक प्रा. पैलवान अमोल साठे, उमर मुक्तार तांबोळी, जयदेव म्हामणे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
दरम्यान कोरिया येथे नुकत्याच झालेल्या "वर्ल्ड मार्शल आर्ट मास्टरशीफ गेम्स 2019" या जागतिक स्पर्धेसाठी सुधीरने कझागिस्थानच्या मल्लाबरोबर पात्रता फेरीत कडवी झुंज दिली. सराव व प्रशिक्षणाच्या अभावाने त्याचा यामध्ये पराभव झाला; परंतु त्याने खचून न जाता जिद्दीने सराव करीत आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे.
 
या स्पर्धेसाठी सुधीरला पुणे धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, नवनाथ जगताप, मोहन गाडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान साहेबराव पवार, कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष पैलवान गणेश मानुगडे, शहाजीबुवा रामदासी, पैलवान मंगेश फडतरे, अमोल फडतरे, हिंदकेसरी संतोष वेताळ, पैलवान धनाजी पाटील, पैलवान लुनेश गोरड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 


पॅन्क्रिशन खेळ

हा खेळ कुस्तीचा उपप्रकार आहे. जागतिक कुस्ती संघटनेने मान्यता दिलेल्या सहा प्रकारांतील एक प्रकार आहे. या संघटनेने मान्यता दिलेले प्रकार पुढीलप्रमाणे ः फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला कुस्ती, बेल्ट रेसलिंग, पॅन्क्रिशन. सुलतान चित्रपटात दाखवलेली कुस्ती जशी खेळली जाते अगदी तशाच प्रकारची कुस्ती म्हणजे पॅन्क्रिशन. यामध्ये प्रतिस्पर्धी बरोबर फाईट आणि कुस्ती करत त्याला चीत करावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com