

Wildlife Threat Grows: Sugarcane Farming Hit Hard by Wild Buffaloes
esakal
-विजय लोहार
नेर्ले: परिसरामध्ये गवे रेडे शेतात घुसले असून त्यांनी अडीच एकर च्या वर ऊस शेतीचे नुकसान केले.येथील माजी सरपंच संदीप संभाजी पाटील व श्री कांबळे यांच्या शेतामध्ये घुसल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान केले.आधी बिबटे आणि आता गवे रेडे यांचे आगमन परिसरात झाल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे वाटेगाव, पाचुंब्री, भाटवडे,कासेगाव,काळमवाडी,माणिकवाडी,पेठ हा परिसर अभयारण्य हब बनल्याचे चित्र आहे.बिबट,गवे,तरस यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.