मांजरी : ऊस तोडणी मजुरांचे हाल सुरूच

मांजरी भागातील चित्र : शिवारांसह खोपटात चिखल, पाणी
अवकाळी पावसाने ऊसतोडणी मजुरांचे मोठे हाल होत आहेत. खोपटाभोवती पाणी साचल्याने या कष्टकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
अवकाळी पावसाने ऊसतोडणी मजुरांचे मोठे हाल होत आहेत. खोपटाभोवती पाणी साचल्याने या कष्टकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.sakal

मांजरी : सलग चार दिवस मांजरीसह परिसरात अवकाळी पावसाने शिवारात धुमाकुळ उडविला आहे. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांचे हाल सुरूच आहेत. शेतात व मजुरांच्या खोपटांमध्ये चिखल व पाणी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

अवकाळी पाऊस न थांबल्याने चिखलामुळे तोडलेला ऊस शेतात पडून राहिला आहे. तोडणी यंत्रणा असूनदेखील साखर कारखान्यांची धुरांडी उसाअभावी थंडावत आहेत. याचा कारखान्यांसह शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अनेक ठिकाणी उसाची वाहने चिखलात रुतत आहेत. बहुतेक साखर कारखान्यांना उसाची टंचाई भासत आहे. आणखी चार दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

अवकाळी पावसाने ऊसतोडणी मजुरांचे मोठे हाल होत आहेत. खोपटाभोवती पाणी साचल्याने या कष्टकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
औरंगाबाद : अखेर सिल्लोड आगारात २३ प्रशासकीय कर्मचारी रुजू

परिसरातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम वेग घेत असतानाच अवकाळीने ब्रेक लागला आहे. त्याचा फटका बसून आता अनेक कारखान्यांना उसाच्या कृत्रिम टंचाईचा फटका बसू लागला आहे. दोन दिवसांनी पाऊस उघडला तरी देखील शेतीशिवारात उसाच्या फडात साचलेले पाणी लगेच हटणार नाही. त्यामुळे कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध होण्यासाठी आठवडाभर थांबावे लागणार आहे.

चार दिवस रात्री तारांबळ

चार दिवस रात्री अचानक आलेल्या पावसाने ऊसतोड मजुरांच्या खोपटात पाणी शिरले. त्यामुळे मजुरांची तारांबळ उडाली. धान्याची पोती, संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. अनेक मजुरांना ट्रॅक्टरच्या खाली अथवा शाळेत बसून रात्र घालवली. त्यांचा वास्तव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com