

Fraud Case Exposed
sakal
मिरज : ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी ११ लाख ७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना बेळंकी (ता. मिरज) येथे घडली. याप्रकरणी संभाजी वसंत रणदिवे (वय ४८, बेळंकी, ता. मिरज) यांनी किरण बालाजी कुराडे (२६, अरणी, धाराशिव) याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून किरण कुराडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.