

कारखानदारांनी याबाबत योग्य ती भूमिका जाहीर करावी, यासाठी पाच दिवसांची वेळ देण्यात आली.
esakal
Sugarcane Protest : कोल्हापूर जिल्ह्यात ज्या कारखान्यांची ३४०० पेक्षा कमी एफआरपी आहे, अशा कारखान्यांनी ३५०० रुपये आणि ज्या कारखान्यांची ३४०० पेक्षा अधिक एफआरपी अधिक १०० रुपये असा फॉर्म्युला मान्य केला आहे, त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कारखानदारांनी हा फॉर्म्युला अमान्य केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आजची बैठक निष्फळ ठरली.