

Swabhimani Shetkari Sanghatana leaders addressing farmers; warning of agitation if sugarcane price not declared before the crushing season.
Sakal
सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाला दर द्यायला जमते. मग, सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना का जमत नाही? सांगली जिल्ह्यात उसाचा उतारा लागत नाही का, असा प्रश्न ‘स्वाभिमानी’कडून उपस्थित केला जातो आहे. कारखान्यांनी दर जाहीर केला नाही तर शेतकरी व वाहतूकदारांनीही तोडी घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे.