स्वीकृत नगरसेवकपदी तनपुरे, कादरी यांची बिनविरोध निवड 

Tanpure, Kadri elected as the councilor
Tanpure, Kadri elected as the councilor

राहुरी : राहुरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मुजफ्फर कादरी यांची बिनविरोध निवड झाली. समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. 

दोन जागांसाठी पाच जणांनी अर्ज

काल (शुक्रवारी) राहुरी पालिकेच्या सभागृहात निवड बैठक संपन्न झाली. प्रभारी नगराध्यक्ष राधा साळवे सभेच्या पिठासीन अधिकारी होत्या. दोन जागांसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या सत्ताधारी जनविकास आघाडीतर्फे अरुण तनपुरे, वसीम सय्यद , मुजफ्फर कादरी, मयुर चुत्तर यांनी; तर विरोधी परिवर्तन आघाडीतर्फे माजी नगरसेवक राजेंद्र उंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. परंतु, उंडे यांचा अर्ज बाद झाला. चुत्तर व सय्यद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. 

डॉ. उषा तनपुरे, विरोधी पक्षनेते सोनवणे उपस्थित

बैठकीस गटनेत्या डॉ. उषा तनपुरे, पालिकेतील विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, नगरसेवक अनिता पोपळघट, नंदा उंडे, संगीता आहेर, सुमती सातभाई, ज्योती तनपुरे, मुक्ता करपे, सोनाली बर्डे, नमिता शेटे, राधिका तनपुरे, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, सोन्याबापू जगधने, शहाजी जाधव, दिलीप चौधरी, अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, अक्षय तनपुरे, विक्रम भुजाडी, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे उपस्थित होते. 

पक्षपात केला जात नाही​

निवडीनंतर बोलताना अरुण तनपुरे म्हणाले, "पालिकेत वीस वर्षांपूर्वी नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून शहर विकासाच्या विविध योजना आणण्याचा प्रयत्न करू. पालिकेत सत्ताधारी व विरोधी असा पक्षपात केला जात नाही.'' यावेळी शिवाजी सोनवणे, मुजफ्फर कादरी, मौलाना अस्लम यांची भाषणे झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com