तासगाव पालिका वार्तापत्र : तिजोरीत खडखडाट, विकासकामे ठप्प

Tasgaon Municipality Newsletter: Treasure in the treasury, development work stalled
Tasgaon Municipality Newsletter: Treasure in the treasury, development work stalled

तासगाव (जि. सांगली ) : पालिकेच्या तिजोरीत केलेला खडखडाट ! वर्षभर कोरोनामुळे ठप्प असलेले कामकाज ! नगरसेवकांचा पालिकेतील अघोषित बहिष्कार यामुळे शहराचा विकासाचा गाडा ठप्प झाला आहे. आता खासदार संजय पाटील यांनीच लक्ष घालून मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. समोर निवडणुका असताना सत्ताधारी गटावर मरगळ आली आहे.

भाजपच्या हातात तासगाव पालिकेची एक हाती सत्ता देऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या चार वर्षाचे सिंहावलोकन करताना सत्ताधार्यानी केले काय ? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. त्यातच गेल्या एक वर्षात पालिकेचा कारभार पूर्ण ठप्प झाला आहे. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे आणि अन्य कारणांमुळे खुद्द सत्ताधारीगटाचे नगरसेवकच पालिकेत येताना दिसत नाहीत. पालिकेतही गेली वर्षभर कोरोना त्यानंतर कोरोना आणि आता स्वच्छ भारत अभियान याशिवाय कामकाज ठप्प झाले आहे. आता पुढील दोन तीन महिने घरपट्टी पाणीपट्टी वसुलीकडे प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

आता प्रभाग रचना बदलणार आहे. नव्याने आरक्षणे पडतील त्यामुळे मिळाले तेवढे "नगरसेवकपदाचे सुख' पुरेसे आहे अशी नकारात्मक भावना सदस्यांमध्ये पसरली आहे. परिणामी दोन नगरसेवक वगळता पालिकेतील नगरसेवकांची आणि नगरसेविका पतींची वर्दळ पूर्ण थांबली आहे. 

वास्तविक पाहता कोरोनाचे सावट पूर्ण दूर झाले आहे. त्यामुळे आलेली मरगळ झटकून सत्ताधारी नगरसेवकांनी उरलेल्या आठ दहा महिन्यात विविध कामामध्ये झोकून द्यायला हवे होते. मात्र तसे होताना दिसत नाही. ज्यांचा राजकारण हा "व्यवसाय' आहे. त्यांनी मात्र आतापासून फिल्डिंग लावायला सुरुवातही केली आहे. आपल्या भाग सुरक्षित करण्याच्या नादाला हे कारभारी लागले आहे मात्र हे करताना आपला नेता आपला पक्ष याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही. 

पुढील निवडणूकीचे आव्हान 
सत्ताधारी नगरसेवकांचा खुद्द आपल्याच नगराध्यक्षांशी असलेला पंगा ! दोन तीन जणांच्या हातात पालिकेचा कारभार ! त्यामुळे बाकीच्या सदस्यांची नाराजी ! यापार्श्वभूमीवर पुढील केलेल्या विकासाच्या कामावर पुढील आठ नऊ महिन्यात निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान सत्ताधारी गटासमोर उभे ठाकले आहे. पालिकेत विस्कळीत झालेली घडी आता खुद्द खासदारांना नीट करावी लागणार आहे.  

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com