'तौक्ते'च्या थरारनाट्याचे 85 साक्षिदार

सांगलीकर मनोज वझेंनी उलगडले समुद्रातील थरारनाट्य
'तौक्ते'च्या थरारनाट्याचे 85 साक्षिदार

सांगली : तौक्ते चक्रीवादळाने (tauktae cyclone) अरबी समुद्रात (arabian sea) थैमान घातले होते. प्रचंड वेगाने वाहणारे वारे, महाभयंकर लाटा, अचानकच वाऱ्याची बदलणारी दिशा... हे वाचूनच अंगावर काटा येतो... प्रत्यक्ष समुद्रात, तेही बंदरापासून आत चाळीस किलोमीटरवर हा अनुभव घेणाऱ्यांची अवस्था काय असेल? सांगलीचे मरीन चीफ (marine chief) इंजिनिअर मनोज वझे तेथे अडकले होते आणि त्यांनी ते थरारनाट्य ‘सकाळ’कडे उलगडून दाखवले. या प्रचंड वादळात त्यांचे जहाज चार इंजिन सुरू करूनही मागे सरकत होते.

मुंबई पोर्टपासून (mumbai port) सुमारे चाळीस किलोमीटर आतमध्ये आउटर अँकर आहे. त्याला जहाजांचे तळ म्हटले तरी चालेल. मुंबई बंदरावर एकावेळी फार जहाजे येऊ शकत नाहीत, त्यामुळे आलेली जहाजे रिकामी होईपर्यंत या आउटर अँकरवर म्हणजे प्रतीक्षा तळावर अन्य जहाजे थांबवली जातात. वझे यांचे जहाज तेथे येऊन थांबले होते. या भयानक वादळाची सूचना त्यांना आधीच मिळाली होती. ते गेली सलग साडेतीन महिने समुद्रात आहेत. तेल निर्मिती कंपन्यांचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांची सुटी या आठवड्यातच सुरू होणार होती.

'तौक्ते'च्या थरारनाट्याचे 85 साक्षिदार
मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सांगलीतील घटना

ते म्हणाले, ‘‘गेली साडेतीन महिने शिपवर होतो. वादळाची सूचना मिळाल्यानंतर आमचे जहाज मुंबई पोर्टपासून ४० किलोमीटर आतमध्ये आउटर अँकरला येऊन थांबले. आश्‍चर्य वाटेल; पण तिथे लाटांची उंची १२ मीटर एवढी होती. जी समुद्रकाठी, पोर्टवर ३ ते ४ मीटर होती. हिरा फिल्डमध्ये बारा ते पंधरा मीटर लाटा उसळत होत्या. एवढ्या प्रचंड लाटांसमोर अनेकदा जहाजांचे नांगर तुटून जाण्याची भीती असते. आम्ही या वादळाला आरामात तोंड देऊ, असा आधी आत्मविश्‍वास होता; परंतु, प्रत्यक्षात वारे ८० किलोमीटरवरून १२० किलोमीटर वेगाने वाहायला लागले आणि मग अडचणी सुरू झाल्या. चार-चार इंजिन सुरू असताना जहाज जागेवर थांबण्यासाठीही ताकद पुरेशी ठरेना. त्यामुळे मागे मागे सरकत होतो. वाऱ्याची दिशा सतत बदलत होती. त्यामुळे जहाज भरकटण्याचा धोका असतो. सकाळी आठपासून हा संघर्ष सुरू झाला. संध्याकाळी सहाला वारे आणि लाटांनी उच्चांक गाठला होता. वादळाची तीव्रता वाढली होती.’’

ते म्हणाले, ‘‘या स्थितीत कसे टिकून राहायचे, मानसिक संतुलन कसे ठेवायचे, याबद्दल आमची तयारी असते. त्यामुळे दडपण आले नाही, मात्र परिस्थिती खूप वाईट होती. थोडी भीती वाटावी, अशीच होती. दुसऱ्या दिवशी पहाटे तीन-चार वाजता हळूहळू परिस्थिती निवळत गेली. आमच्या जहाजावर ८५ लोक होतो. आम्ही धीराने याला तोंड दिले. आमचे काम हिरा फिल्ड, पन्ना फिल्ड येथे बंदरापासून सुमारे दीडशे ते अडीचशे किलोमीटर आतमध्ये चालते. तेथे तेल उत्खनन कंपन्या आहेत. या स्थितीत भारतीय नौदलाने खूप जिगर दाखवली. त्यांनी संपूर्ण व्यवस्था हातात घेतली आणि परिस्थिती हाताळत अनेकांना जीवदान दिले.’’

'तौक्ते'च्या थरारनाट्याचे 85 साक्षिदार
भारताकडून 40,300 युजर्सच्या डेटाची मागणी; फेसबुकचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com