बेळगाव: लाच मागणारा तहसीलदार आणि त्याचा नातेवाईक लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात

धर्मादाय खात्याचा तहसीलदार दशरथ नकुल जाधव आणि नातेवाईक संतोष कडोलकर अशी अटक करण्यात आले
Bribe
Bribesakal

बेळगाव: देवस्थान जीर्णोद्धारासाठी मंजूर झालेला निधी देण्यासाठी २० हजाराची लाच मागणारा धर्मादाय खात्याचा तहसीलदार(Tehsildar)आणि त्याचा नातेवाईक लाच लुचपत खात्याच्या (एसीबी) जाळ्यात रंगेहात अडकले आहेत. शुक्रवार (ता. २१) रात्री एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. धर्मादाय खात्याचा तहसीलदार दशरथ नकुल जाधव(dashrath jadhav)आणि नातेवाईक संतोष कडोलकर अशी अटक करण्यात आलेल्या संशयियांची नावे आहेत.

Bribe
सरस्वतीच्या दारी अखेर "लक्ष्मी दर्शन"!

रामदुर्ग येथील यकलमा देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी धर्मादाय खात्याच्या आराधना योजनेतून ४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. अनुदान देण्यासाठी तहसीलदार नकुल जाधव यांनी वीस हजार रुपये देण्याची मागणी केली होती. तहसीलदारानी लाच देण्याची मागणी केल्याने संबंधित देवस्थानचे सुभाष घोडके यांनी याबाबत एसीबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन संबंधितांना अटक करण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार काल रात्री तहसीलदार नकुल जाधव यांच्यासाठी लाच स्वीकारताना त्यांच्या नातेवाईकाला रंगेहात अटक करण्यात आली.

Bribe
कोल्हापूर : कारवाईने उतरवला ‘एलसीबी’चा रुबाब

त्यामुळे याप्रकरणी तहसीलदार जाधव यांना देखील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक करूनाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आडीवेश गुदीगोप्प आणि सुनील कुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारी बाबूचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com