esakal | Video : साताऱ्यात पाच घरांसह दुकान फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद
sakal

बोलून बातमी शोधा

Video : साताऱ्यात पाच घरांसह दुकान फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पाेलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली आहे. श्वानास काही वस्तुंचा वास देण्यात आला. त्यानंतर श्वान परिसरातील काही रस्त्यांवर घुटमळले.

Video : साताऱ्यात पाच घरांसह दुकान फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील बुधवार पेठेत आज मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच घरे फोडली. त्यामध्ये सुमारे चार लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी गोंधळ घातला.


शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी मंडईजवळ असलेले दारूचे दुकान फोडून सुमारे नऊ हजार रुपयांची रोख रक्कम लांबविली. त्यानंतर मंडईतील ओढ्यातून येऊन बुधवार पेठेकडे (लकडी पूल) परिसरात चोऱ्या केल्या. तेथील "अमीन ट्रेडर्स' या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे 15 हजार रुपयांची सुट्टी नाणी लंपास केली. याच परिसरातील अस्लम शेख यांचे घरही त्यांनी फोडले. त्यांच्या घरामधून कपडे, बॅग व इतर साहित्य लंपास केले. याच परिसरातील जरीना शेख, मुसा शेख यांच्याही घरांवर चोरट्यांनी हात साफ केला. मात्र, या घरात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. या परिसरात राहणाऱ्या यासीन शेख या परप्रांतीय सोने कारागिराचे घरही चोरट्यांनी फोडले. त्यांच्या घरातून तीन लाख 60 हजार रुपये किमतीचे सोने चोरट्यांनी लंपास केले. आज सकाळी घरफोडीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर काही जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, "अमीन ट्रेडर्स'मधील दुकानात चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ते सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पाेलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली आहे. श्वानास काही वस्तुंचा वास देण्यात आला. त्यानंतर श्वान परिसरातील काही रस्त्यांवर घुटमळले.


वाचा : नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

हेही वाचा : अजित पवार आणणार कराडला औद्योगिक कॉरिडोर ?

नक्की वाचा : ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार

वाचा : ...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण

loading image
go to top