कऱ्हाड - चिपळूण महामार्ग पूर्णत्वाचे आव्हान

कऱ्हाड - चिपळूण महामार्ग पूर्णत्वाचे आव्हान
Updated on

कोयनानगर (जि. सातारा) : मुळातच अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कऱ्हाड ते चिपळूण महामार्गाच्या कामाच्या पूर्णत्वाची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्या कामाबाबत, रस्त्याच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न आहेत.

हेही वाचा - शिवेंद्रसिंहराजेंचा टोल नाका बंदचा निर्धार

कऱ्हाड ते चिपळूण महामार्गासाठी केंद्र सरकारने 287 कोटी रुपये निधी दिला आहे. कऱ्हाड ते विजयनगरपर्यंत पहिल्या टप्प्यात रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. मात्र, दुसऱ्या टप्यातील संगमनगर- धक्‍क्‍यापर्यंतचे काम 2017 मध्ये सुरू झाले. तीन वर्षांत ते पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी रस्ता दुतर्फा दहा मीटरने वाढवून रुंदीकरण सुरू आहे. त्या कामात विकसक एल ऍण्ड टी या कंपनीला अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. कामासाठी उपठेकेदार नेमण्यात आला आहे. रस्त्याचे तुकडे करून त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळणच झाली आहे.

हेही वाचा -  पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार

31 डिसेंबर 2019 पर्यंत सिमेंट कॉंक्रिटचा वापर करून तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची अट घातली गेलेली आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर कामाची मुदत संपत आली, तरी रस्ता वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने काम करणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यामध्ये या रस्त्याचे काम 31 डिसेंबरपर्यंत करण्याचे व तो रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत एकेरी वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे काम करणाऱ्या संबंधित कंपनीने त्या कामास दहा दिवसांची मुदत मागितली आहे. ती त्यांना देण्यात आली आहे. 

हेही वाचा - नऊ दारू दुकाने, बिअर बारवर गंडांतर ; आता खाकीच्याच हातात भवितव्य
 


रस्त्याचे काम करणाऱ्या विकसकास दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विजयनगर ते संगमनगर या 48 किलोमीटरच्या रस्त्यावरील एकेरी वाहतुकीसाठी रस्ता सुरू करावा, त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना त्या वेळेत काम करावे लागणार आहे. 

रमेश पन्हाळकर, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com