"हे' आहेत मॉर्निंग वॉकचे फायदे (व्हिडिओ)

सुस्मिता वडतिले
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- हिवाळ्याची चाहूल
- थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले
- कोवळ्या उन्हात सकाळी नागरिकांची गर्दी
- योगासने, व्यायामातून शरीर तंदुरुस्त

सोलापूर : येथील उन्हाची तीव्रता कमी होत असून दयानंद महाविद्यालय, विणकर बाग, किल्ला बाग, महापालिका, पार्क चौक, नेहरूनगर, आसरा, डी-मार्ट, कंबर तलाव परिसरात सकाळी कोवळ्या उन्हात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. निरोगी आयुष्यासाठी हवी असते योग्य जीवनशैली, आहारपद्धती व व्यायाम. आपल्याला ठेवता येते. सध्या अनेकजण आरोग्याबाबत जागरूक असून मॉर्निंग वॉक करत आहेत.
आश्‍विन महिना संपत आला, की थंडीची सुरवात होती. वातावरणात गारवा जाणवू लागतो. हिवाळा ऋतू सुरू होतो. आल्हाददायक पावसाळा, कडक उन्हाळा आणि गुलाबी थंडीचा हिवाळा त्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे सगळ्यांनाच आवडतो. यामुळे वातावरण प्रसन्न वाटू लागते. हिवाळ्यात निसर्गसौंदर्याने सृष्टी खुलते.

ठरलं? शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद, तर आघाडीला...

एरवी नको नकोसे वाटणारे ऊन त्याच्या उबदारपणामुळे हवेहवेसे वाटू लागते. कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी तो सकाळच्या कोवळ्या उन्हाची आतुरतेने वाट पाहतो. शहरातील काही मुख्य भागात हिवाळ्यात गुलाबी थंडीमुळे मॉर्निंग वॉक करण्यासाठी गर्दी पाहावयास मिळत आहे. अनेकजण सकाळी उठून मस्त चहा घेऊन मॉर्निंग वॉकला निघतात. त्यात काही रोजच्या व नेहमीच्या व्यक्ती क्रॉस होत असतो. त्यातल्या काही ओळख दाखवतात तर काही दाखवत नाहीत. रोज क्रॉस होणारी व्यक्ती दिसली नाही की, लगेच काळजी वाटते.

सोलापूरच्या चाव्या या बहीण-भावाच्या हाती

मॉर्निंग वॉकमुळे दिवसभर प्रसन्न वाटते. मॉर्निंग वॉकच्या दरम्यान आपल्या आवडत्या व्यक्तीशी काहीजण रस्त्यावर उभे राहून बोलत उभे असतात. सर्वजण एकत्र येऊन गप्पा मारत काही वेळ विश्रांती घेतात. त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण सुरू असते. काहीजण एकत्र समूहाने मॉर्निंग वॉक करत असतात, यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते. हसण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. सकारात्मक ऊर्जा मिळते.
-
आम्ही 50 वर्षांपासून मॉर्निंग वॉक करत आहोत. बागेत मॉर्निंग वॉकला आल्यावर गर्द हिरवी झाडी, प्रसन्न वातावरणामुळे खूप चांगले वाटते. तरुण पिढीने लक्षात ठेवले पाहिजे, की व्यायामाशिवाय पर्याय नाही. व्यायामामुळे शरीर आणि मनाचे संवर्धन होते. निरोगी शरीरासाठी व्यायाम आणि योग्य आहाराची सांगड घातली पाहिजे.
- ऍड. अशोक वळसंगकर
-
40 वर्षांपासून आम्ही मॉर्निंग वॉक करतो. सकाळी फिरल्याने ओझोन वायू आणि ऑक्‍सिजन आणि शुद्ध हवा मिळते. मॉर्निंग वॉकमुळे आपण फिॅट राहतो दिवस फ्रेश जातो. मुख्य सकाळी फिरण्याने भरपूर एनर्जी मिळते.आम्हाला व्यायामाची पहिल्यापासूनच आवड आहे.
- डॉ. अश्‍विनी वळसंगकर
-
अनेक वर्षापासून मॉर्निंग वॉक करते, मला मॉर्निंग वॉक करण्याचे आवड आहे. धावपळीच्या युगात स्वत:साठी थोडासा वेळ दिलाच पाहिजे. सकाळची शुद्ध हवा ही सर्वांसाठी लाभदायक असते.
- ऐश्‍वर्या बिराजदार, युवती
-
प्रत्येकाने मॉर्निंग वॉक केलेले खूप चांगले असते. मॉर्निंग वॉक केल्यावर मन ताजेतवाने होऊन जाते. मॉर्निंग वॉक स्वत:ला दिवसभर प्रसन्न वाटते. म्हणून मी आवर्जून मॉर्निंग वॉक करतेच.
- स्नेहा बिराजदार, युवती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These are the benefits of the Morning Walk