esakal | सायकलवरून इचलकरंजीहून ते निघाले बिहारला, पण झाले भलतेच
sakal

बोलून बातमी शोधा

 they left Ichalkaranji for Bihar on a bicycle, but...

इचलकरंजी येथील एका उद्योजकाकडे काम करणारे सायकलवरून बिहारला निघालेले सत्तर कामगारांना मिरज पोलिसांनी अडवले.

सायकलवरून इचलकरंजीहून ते निघाले बिहारला, पण झाले भलतेच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज (जि. सांगली) : इचलकरंजी येथील एका उद्योजकाकडे काम करणारे सायकलवरून बिहारला निघालेले सत्तर कामगारांना मिरज पोलिसांनी अडवले. या सर्वांची पोलिसांनी परत इचलकरंजीस रवानगी केली. 

हे पन्नासहून अधिक कामगार इचलकरंजी येथील एका खासगी सुत कंपनीत मजूर म्हणून काम करीत होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हे 70 कामगार समुहाने शिवाजी रोडवरून पंढरपूरच्या दिशेने जाताना पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांना दिसले. त्यांनी तातडीने या सर्वांना मिरजेतील शाहू चौकात हटकून त्यांच्याकडे चौकशी केली. सूत कंपनीच्या मालकांकडून म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने आणि उपासमार सुरू झाल्यामुळे आम्ही सायकलने उत्तरप्रदेश आणि बिहारकडे निघाल्याचे त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा - प्रवाशांच्या सेवेसाठी  तामिळनाडूत प्रथमच एसटी पोहोचली 

उपाधीक्षक गिल यांनी या सर्वांना नाष्टा, चहा आणि दुपारचे जेवण दिले. त्यांच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली असता यापैकी बहुसंख्य जणांकडे आधार कार्ड अथवा अन्य कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांची परत इचरकंरजीस पाठवणी करण्याचा निर्णय पोलीस उपाधीक्षक गिल आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतला. याबाबत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशीही संपर्क साधून चर्चा करण्यात आली. 
दरम्यान, अशाप्रकारे सैरभैर झालेले परप्रांतीय मजूर कोठेही समूहाने जाताना दिसल्यास नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलिस यंत्रणेने केले आहे. 

हे पण वाचा - प्रत्येक जिल्ह्यात हेलीपोर्ट चा लवकरच निर्णय : डॉ. विश्वजीत कदम

मजूर आलेच कसे? 
इचलकरंजी मध्ये कारखानदारांकडून पैसे आणि अन्न मिळाले नसल्याने या 70 कामगारांनी सायकलवरून बिहारची वाट पकडली खरी, परंतु कोणत्याही जिल्ह्याची हद्द ओलांडताना चौकशी होते. मात्र इचलकंरजी ते मिरज यादरम्यान या मजुरांना कोणीच कसे हटकले नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.