"त्या' लोकांचे थर्ड डिग्री करून एनकाऊंटर करावेत' (VIDEO)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

पोलिसांना मिळाले बळ 

या प्रकरणामुळे देशभरातील पोलिसांना बळ मिळाले आहे. तसेच देशभरातील महिलांनाही बळ मिळाले आहे. पोलिस जे संरक्षण देण्याचे काम करतात त्यांनीच एनकाऊंटर केल्यामुळे पोलिसांनाही बळ मिळाले. त्यांनाही आता आपणही काही असे करू शकतो याची जाणीव झाली. 

- प्रणिती शिंदे, आमदार, सोलापूर शहर मध्य 

सोलापूर ः हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेल्या एनकाऊंटरचे आमदार प्रणिती शिंदे यांनी समर्थन केले आहे. आज शुक्रवारी सकाळी त्यांनी या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली. 

हेही वाचा... तो पोलिसांना म्हणाला होता एनकाऊन्टर करा झाले तसेच 

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या,""एनकाऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचे अभिनंदन आहे. अशा प्रकरणांमध्ये एनकाउंटर करण्याची वेळ पोलिसांवर आली तर, अशा वेळी सरकारने पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि फाईल क्‍लोज झाली पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करायला वेळ लागतो. उन्नावच्या प्रकरणात काय झाले हे आपण पहातच आहोत. जलतगती न्यायालय स्थापन झाले तरी वेळ लागतो. मी पोलिसांचे समर्थन करते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मी सलाम करते. केवळ देशातच नव्हे तर जगभरात कुठेही महिलांवरील अत्याचार अति होत जातील, तेंव्हा पोलिसांनी अशाच पद्धतीने एनकाऊंटर केले पाहिजे. इतकेच नव्हे तर थर्ड डिग्री करून एनकाऊंटर केले पाहिजे. अशा प्रकरणात कायद्याच्या माध्यमातून आणि सरकारकडूनही पोलिसांना शाबासकी मिळाली पाहिजे.'' 

हेही वाचा... दिशाला न्याय मिळाला, निर्भयाला कधी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "They should be" encounterd by third degree "