दहा लाखाच्या बनावट नोटासह कोल्हापुरात तिघांना अटक

Fake Currency three arrested in Kolhapur
Fake Currency three arrested in Kolhapur

कोल्हापूर - सोशल मिडीयावरील व्हिडीओ पाहून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने पर्दाफाश केला. दिवाळी, निवडणुकीच्या धामधुमीत बनावट नोटा बाजारात आणून अर्थव्यवस्थेला धक्का पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीचा डाव या कारवाईमुळे वेळीच उधळला गेला. संशयितांकडून 10 लाखांच्या बनावट नोटासह, लॅपटॉप प्रिंटर, कटरही पोलिसांनी जप्त केला असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अटक केलेल्या संशयितांची नावे - जीवन धोंडीबा वरूटे (वय 24, रा. दातारमळा, इचलकरंजी), सागर शिवानंद कडलगे (वय 21 लंगोंटे मळा, इचलकरंजी) आणि रोहित राजू कांबळे (वय 19, रा. दतार मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. 

बनावट नोटेच्या चर्चेतून मिळाला तपासाचा धागा... 

इचलकरंजी परिसरातील दातार मळा येथे दिवाळी खरेदीच्या माध्यमातून एक तरुणाने बनावट नोट खपवत आहे. निवडणुकीतही या नोटांचा वापर केला जाणार आहे, अशी चर्चा सुरू होती. याची माहिती पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते यांना मिळाली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. त्याच्या मार्गदर्शनानुसार पथकाने संशयित जीवन वरुटेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो त्याचे साथिदार संशयित सागर कडलगे व रोहित कांबळे बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी सापळा रचून सागर व रोहित या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. त्यात त्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना अटक केली. 

जीवनची आयडीया... 
संशयित जीवन याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. तो सध्या हमाली करतो. रोहित व सागर या दोघांचे शिक्षण नववीपर्यंत झाले. ते दोघेही हातमाग कामगार म्हणून काम करतात. तिघांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. जीवनने मोबाईल सोशल मिडीयावरील नोटा तयार करण्याचा एक व्हिडीओ पाहीला. त्यातूनच त्याला बनावट नोटा तयार करून त्या दिवाळीत व निवडणुकीच्या धामधुमीत खपविण्याची कल्पना सुचली. त्याने ही कल्पना सागर व रोहितच्या कानावर घातली. झटपट श्रीमतं होण्याचा हा मार्गही त्या दोघांना पसंत पडला. सुरवातीला लॅपटॉप, प्रिटंर व कटरच्या आधारे बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न या तिघांनी केला. त्यात यश येत असल्याचे पाहून त्या तिघांनी सुमारे अडीच महिन्यापूर्वी बनावट नोटांची छपाई सुरू केली. 

रोहितच्या घरात छपाई... 
सोशल मिडीयावरील नोटा तयार करण्याचा व्हिडीओ पाहून नोटांची छपाई संशयित रोहीतच्या घरी सुरू झाली. संशयित जीवन वरुटे हा नोटा छपाई करायचा. हातमागावरील कामाचा अनुभव असणारा रोहीत कटरच्या सहायाने नोटांचे कटींग करायचा. 

बनावट नोटांचा तपशील 
2000 रूपयांच्या 260 नोटा  
500 रुपयांच्या 565 नोटा 
200 रूपयांच्या 490 नोटा 
100 रुपयांच्या (नवीन) 265 नोटा
100 रुपयांच्या (जुनी) 270 नोटा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com