अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पुतणी थोडक्यात बचावली

Three members of the same family die in a tragic accident
Three members of the same family die in a tragic accidentThree members of the same family die in a tragic accident

कऱ्हाड : कारला मागून डम्परने धडक दिल्याने मलकापूर-कऱ्हाड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पेठ ते सांगली रस्त्यावर आष्टानजीकच्या गाताडवाडी नजीक शनिवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पोळ कुटुंबीय सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना हा अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार, मलकापूरचे व्यावसायिक अधिकाराव पोळ (४९), त्यांची आई गीताबाई (७०) पत्नी सुषमा (४२), भावजय सरिता सुभाष पोळ (३५) सर्व रा. पोळ वस्ती मलकापूर-कऱ्हाड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात पुतणी थोडक्यात वाचली. मलकापूर येथील पोळ कुटुंबीय शनिवारी सकाळी सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले.

Three members of the same family die in a tragic accident
राज्य सरकारला संप मिटवण्यात अपयश; परबांचे मोठे विधान

कारमध्ये पाच जण बसले होते. गाताडवाडी येथे समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ यांनीही कारचा ब्रेक दाबला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यामुळे त्यांची कार मधोमध फसली. यातच चौघांचा मृत्यू (Died) झाला. मागील वाहनाची जोरात धडक बसल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस अपघाताची माहिती घेत आहेत. त्यानंतरच सविस्तर माहिती मिळू शकते असे पोलिसांनी सांगितले.

नागरिकांनी दिली अपघाताची माहिती

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. उपस्थितांपैकी कोणीतरी पोलिसांना अपघाताची (Road Accident) माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तसेच जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com